हिंदुजा समूहाचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांचे निधन, लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास

श्रीचंद परमानंद हिंदुजा हे काही दिवसांपासून आजारी होते.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हिंदुजा समूहाचे अध्यक्ष आणि चार हिंदुजा बंधूंपैकी ज्येष्ठ श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचे बुधवारी (१७ मे) लंडनमध्ये निधन झाले. श्रीचंद परमानंद हिंदुजा 87 वर्षांचे होते. हिंदुजा कुटुंबाच्या प्रवक्त्याने त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. Hinduja Group Chairman SP Hinduja passed away breathed his last in London

श्रीचंद परमानंद हिंदुजा हे काही दिवसांपासून आजारी होते. प्रवक्त्याने सांगितले की, “गोपीचंद, प्रकाश आणि अशोक हिंदुजा यांच्यासह संपूर्ण हिंदुजा कुटुंब अत्यंत दुःखाने कळवत आहे की, कुटुंबाचे प्रमुख आणि हिंदुजा समूहाचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांचे निधन झाले आहे.”

भारतीय वंशाचे श्रीचंद परमानंद हिंदुजा यांनी नंतर ब्रिटिश नागरिकत्व घेतले होते आणि ते लंडनमध्येच राहत होते. एस.पी. हिंदुजा यांच्या मुलींनी त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आणि सांगितले की, त्यांच्या कार्य आणि परोपकाराद्वारे भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर आणण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे स्मरण केले जाईल.

गेल्या वर्षी ‘द संडे टाइम्स रिच लिस्ट’मध्ये हिंदुजा बंधूंनी 28.472 अब्ज GBP संपत्तीसह ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले होते.

Hinduja Group Chairman SP Hinduja passed away breathed his last in London

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात