ज्ञानवापी शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगसाठी हिंदू पक्ष सुप्रीम कोर्टात जाणार; पण कार्बन डेटिंग म्हणजे काय?

वृत्तसंस्था

वाराणसी : ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाच्या कार्बन डेटिंग साठी वाराणसी कोर्टात हिंदू पक्षाने केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. संबंधित शिवलिंग आणि परिसरातील कोणत्याही गोष्टींबाबत छेडछाड होऊ नये, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्याने कार्बन डेटिंगचे आदेश देता येत नाहीत, असे वाराणसी कोर्टाच्या निकाल पत्रात नमूद केले आहे. या संदर्भात हिंदू पक्षाने आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायचा निर्णय घेतला असून ज्ञानवापी मशिदीचे सत्यान्वेषण आणि शिवलिंगाचे कार्बन डेटिंग या दोन मुद्द्यांच्या आधारे सुप्रीम कोर्टात अर्ज करणार असल्याचे हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी स्पष्ट केले आहे Hindu party to approach Supreme Court for carbon dating of Gnanavapi Shivlinga



ज्ञानवापी मशिदीच्या वजुखान्यात असलेल्या कथित शिवलिंगाची कार्बन डेटिंग चाचणी करण्याची हिंदू पक्षकारांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे हे शिवलिंग किती पुरातन आहे, किती वर्षांपूर्वीचे आहे, यासाठी चाचणी करता येणार नाही. हिंदू पक्षकारांकडून मशिदीतील शिवलिंग म्हणजे प्राचीन विश्वेश्वर महादेव असल्याचा दावा केला आहे. त्यासाठीच हिंदू पक्षकारांनी कार्बन डेटिंगची मागणी केली होती. परंतु ज्ञानवापी मशिदीकडून या मागणीला जोरदार विरोध करण्यात आला. वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीची बाजू उचलून धरत शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची मागणी फेटाळून लावली आहे. या निकाला विरोधात हिंदू पक्ष आता सुप्रीम कोर्टात जाणार आहे.

कार्बन डेटिंग म्हणजे काय?

एखाद्या वस्तूचे वय म्हणजे ही वस्तू किती जुनी कोणत्या कालावधीतली आहे हे ठरविण्याच्या पद्धतीला कार्बन डेटिंग म्हणतात. कार्बन डेटिंगला रेडिओ कार्बन डेटिंग असेही नाव आहे. कार्बन डेटिंगमध्ये कार्बनमध्ये C – 14 नावाचा एक विशेष समस्थानिक म्हणजे आयसोटॉप असतो. याचे अणू वस्तुमान 14 इतके असते. हा कार्बन रेडिओऍक्टिव्ह असतो. जसजशी ही वस्तू नष्ट होते, त्याप्रमाणे हा कार्बनही कमी होतो. यावरून एखाद्या धातू वस्तू अथवा सजीव प्राणी यांचे वय निश्चित करता येऊ शकते.

Hindu party to approach Supreme Court for carbon dating of Gnanavapi Shivlinga

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात