खलिस्तानी घोषणा लिहिल्या; काचही फोडली
विशेष प्रतिनिधी
अमृतसर : Amritsar अमृतसर बस स्टँडवर हिमाचलमधील सुजानपूरहून आलेल्या बसची काच अज्ञाताने फोडली आणि त्यावर ‘खलिस्तान जिंदाबाद’ असे लिहिल्याची घटना घडली आहे. बसचालक सुरेश कुमार यांनी सांगितले की, ते सुजानपूरहून अमृतसरला आले आणि बस स्टँडवरील १२ क्रमांकाच्या गेटसमोर बस लावली.Amritsar
रात्री उशीरा कोणतरी त्यांना सांगितले की त्यांच्या बसच्या खिडक्या तुटल्या आहेत आणि तुटलेल्या काचेसोबतच बसवर खलिस्तान लिहिलेले होते. यावर त्यांनी रोडवेजच्या जीएमला याची माहिती दिली. यानंतर खलिस्तानच्या घोषणा पुसण्यात आल्या.
या प्रकरणाचा तपास रामबाग पोलिस ठाण्याकडून केला जात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल असे सांगण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App