हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; सर्वेक्षणात भाजपची सरशी, आम आदमी पार्टीचा काँग्रेसला फाऊल!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. विधानसभेच्या 68 जागांमध्ये जागांवर एकाच टप्प्यात 12 नोव्हेंबरला मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. हिमाचल प्रदेश विधानसभेची पंचवार्षिक मुदत 8 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. बरोबर त्याच्या आधी 1 महिना 8 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहेत. 10 डिसेंबर पर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. Himachal Pradesh assembly election dates announced

या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आणि निवडणूक रणनीती संस्थांनी केलेल्या मतदार मतदान पूर्व चाचणीत भाजप तेथे सत्ता राखील, तर काँग्रेस या स्पर्धेत मागे पडण्यासाठी आम आदमी पार्टी कारणीभूत ठरेल असे स्पष्ट झाले आहे.

हिमाचलमध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वेळा हिमाचलमध्ये गेले आहेत. त्यांच्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा देखील प्रचाराचा धुमधडाका सुरू झाला आहे. हिमाचल हे नड्डांचे गृहराज्य आहे. त्याचबरोबर आजच निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच प्रियांका गांधी यांनी काँग्रेसच्या प्रचाराची सोलन मधील माँ शूलिनी मंदिरात दर्शन घेऊन केली आहे. त्यांचे सोलनमध्ये महापरिवर्तन रॅलीत भाषण देखील झाले आहे.

काँग्रेसने 63 पैकी 39 उमेदवारांची नावे निश्चित केल्याचे सांगितले जात असून त्यासाठी त्यांनी पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा आधार घेतला आहे. परंतु विविध वृत्तवाहिनांच्या सर्वेक्षणानुसार भाजप तेथे काँग्रेसवर मात करेल आणि काँग्रेसच्या प्रयत्नांना आम आदमी पार्टीच्या प्रयत्नांचा छेद जाईल. आम आदमी पार्टी जरी तिसऱ्या क्रमांकावर राहिली तरी काँग्रेसची मते बऱ्या प्रमाणावर फोडेल. त्याचा फायदा भाजपला होईल, असे वृत्तवाहिन्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहेत. अर्थात हे प्राथमिक आकडे असल्याचे स्पष्टीकरण सर्व वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

Himachal Pradesh assembly election dates announced

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात