वृत्तसंस्था
कोलकाता : कर्नाटकातील हिजाब वादाचे लोण आता पश्चिम बंगालमध्ये पोचले आहे. मुर्शिदाबादमध्ये शाळेचे गणवेश नियम पाळण्याला विद्यार्थिनीनी विरोध करून हिजाब घालण्याचा आग्रह धरला. त्यामुळे त्यांना रोखण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. Hijab in West Bengal; Students protest against school uniform rules in Murshidabad
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये विद्यार्थिनींना वर्गात हिजाब घालण्यापासून रोखल्याचा आरोप शाळेच्या मुख्याध्यापकावर करण्यात आला. या प्रकरणी शिक्षकांना कैद करण्यात आले. बॉम्ब फेकण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. शाळेमध्ये स्कुल युनिफॉर्म घालावा, या नियमाचे पालन केले, असे शिक्षकांच्या म्हणणे आहे. शाळेचा युनिफॉर्म हा शाळेत घालणे बंधनकारक आहे. तेथे हिजाब घालण्यास परवानगी नाही. त्यानुसार मुलींना हिजाब घालता येणार नाही, अशी भूमिका शाळा प्रशासनाने घेतली. त्यामुळे वाद निर्माण झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App