वृत्तसंस्था
बेंगलुरू : कर्नाटकात सुरू झालेला हिजाबचा वाद आता देशात राजकीय रणकंदनाचा विषय बनला असताना कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. विद्यार्थिनींनी शाळा, महाविद्यालय सोडून बाकीच्या ठिकाणी हिसाब वापरावा का नाही, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणात्याही पोशाखाच्या मुद्द्यावर कर्नाटक सरकारची अजिबात कोणतीही ढवळाढवळ नाही. पण मूळ प्रश्न शालेय आणि महाविद्यालयीन गणवेश घालण्या संदर्भातला आहे, असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. Hijab Controversy: The question is not about hijab, but about school uniforms !!; Karnataka Revenue Minister R. Ashok’s clear revelation
शाळांमध्ये गणवेश अनिवार्य आहे आणि तो फक्त कर्नाटकातच नव्हे, तर संपूर्ण देशात शाळांमध्ये गणवेश अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारची शालेय गणवेश या संदर्भातली भूमिका स्पष्ट आहे. शाळांमध्ये गणवेश घालूनच आले पाहिजे, असे आर. अशोक यांनी स्पष्ट केले आहे.
आर. अशोक यांच्या निवेदनानुसार शालेय गणवेश या पुरताच हा विषय मर्यादित असल्याचे दिसत आहे. परंतु त्याला राजकीय रंग चढवण्यात आला आहे. त्याचबरोबर मुलींनी हिजाब परिधान करण्याला कर्नाटक सरकारने शाळा-महाविद्यालयांच्या बाहेरही विरोध केल्याचा भासविण्यात येत आहे. प्रत्यक्षात अशोक यांनी निवेदन केल्यानुसार तशी वस्तुस्थिती नसल्याचे दिसत आहे.
हिजाबच्या वादात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही उडी घेतली आहे. प्रियांका गांधींच्या या वक्तव्यामुळे हा वाद आणखी पेटू शकतो. प्रियांका गांधी यांनी बुधवारी सांगितले की, महिलांनी बिकिनी घालायची की हिजाब हा त्यांचा निर्णय आहे, मला याप्रकरणी कोणालाही सल्ला देण्याचा अधिकार नाही.
प्रियांका गांधी यांनी ट्विट करून लिहिले की, ‘बिकिनी घालावी, घूंघट घालावा, जीन्स घालावी किंवा हिजाब घालावा, हा महिलांचा अधिकार आहे की, त्यांनी काय घालावे आणि हा अधिकार भारतीय राज्यघटनेने त्यांना मिळाला आहे. भारतीय राज्यघटना त्यांना काहीही परिधान करण्याचे स्वातंत्र्य देते. त्यामुळे महिलांचा छळ करणे थांबवा.
नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मलालाने महिलांना अभ्यासापासून वंचित ठेवू नका, असे आवाहन केले आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबाननेही यावर आपले मत व्यक्त केले आहे. तालिबानचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तानातील महिलांना बुरख्यातच राहावे लागेल.
मलाला युसूफझाईच्या वक्तव्याला कर्नाटक भाजप नेते सी. टी. रवी यांनी विरोध केला आहे. मलाला भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये कशी बोलू शकते?, असा सवाल त्यांनी केला.
भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय म्हणतात की, कुराणचा पहिला शब्द इकरा आहे, ज्याचा अर्थ अभ्यास आहे, परंतु कर्नाटकात आपण जे पाहतोय ते ज्ञानाचा शोध नाही. हे शिक्षण सोडून सर्व काही आहे. धर्माच्या नावाखाली मुलींना शिक्षणाऐवजी हिजाब निवडण्यास सांगितले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App