Hijab Controversy : बंगळुरूत शाळा-कॉलेजच्या 200 मीटरच्या आत लोकांना एकत्र येण्यास बंदी, उच्च न्यायालयाने प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवले

Hijab Controversy: People banned from gathering within 200 meters of school-college in Bangalore, High Court sends case to Upper bench

Hijab Controversy : कर्नाटक सरकारने हिजाबच्या वादाच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमधील शाळा, महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्थांच्या 200 मीटरच्या आत लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. हे निर्बंध पुढील दोन आठवडे कायम राहणार आहेत. कर्नाटक पोलिसांनी सांगितले की, हा आदेश तत्काळ लागू होईल. यापूर्वी राज्य सरकारने सर्व शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. Hijab Controversy: People banned from gathering within 200 meters of school-college in Bangalore, High Court sends case to Upper bench


वृत्तसंस्था

बंगळुरू : कर्नाटक सरकारने हिजाबच्या वादाच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमधील शाळा, महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्थांच्या 200 मीटरच्या आत लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. हे निर्बंध पुढील दोन आठवडे कायम राहणार आहेत. कर्नाटक पोलिसांनी सांगितले की, हा आदेश तत्काळ लागू होईल. यापूर्वी राज्य सरकारने सर्व शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

येथे सलग दुसऱ्या दिवशी कर्नाटक उच्च न्यायालयात या वादावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही. हे प्रकरण बुधवारी मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले. मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले होते की, कोणाच्या भावनांच्या आधारे निर्णय घेणार नाही, तर कायद्याच्या आधारे निर्णय घेऊ.

मंगळवारी कर्नाटकातील मंड्या येथील कॉलेज कॅम्पसमध्ये एक मुलगी ‘अल्लाह-हू-अकबर’चा नारा देताना दिसली, तेव्हा विद्यार्थ्यांनी जय श्रीरामने प्रतिसाद दिला. आता या प्रकरणाचे राजकारण अधिक गडद झाले आहे. प्रियांका गांधी म्हणाल्या की, मुलींना काहीही घालण्याचा अधिकार आहे, मग ती बिकिनी असो किंवा हिजाब. त्याचवेळी AIMIM नेते असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाबचे समर्थन केले आहे. याआधी नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझाईने महिलांना त्यांच्या पेहरावामुळे शिक्षणापासून दूर करणे योग्य नसल्याचे म्हटले होते.

ओवैसी म्हणाले- हिजाबच्या हक्कासाठी लढणाऱ्या बहिणींसोबत

उत्तर प्रदेशातील संभल येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान ओवैसी म्हणाले, ‘कर्नाटकमध्ये हिजाब घालण्याच्या अधिकारासाठी लढणाऱ्या बहिणी यशस्वी व्हाव्यात अशी मी प्रार्थना करतो. कर्नाटकात राज्यघटनेची खिल्ली उडवली जात आहे. भाजप सरकारच्या या निर्णयाचा मी निषेध करतो.

कॅम्पसमध्ये ‘अल्लाह-हू-अकबर’ आणि ‘जय श्री राम’च्या घोषणांना परवानगी नाही

याप्रकरणी कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांचे वक्तव्य समोर आले आहे. राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शालेय शिक्षण मंत्री बीसी नागेश या वादावर म्हणाले, “मंडयामधील विद्यार्थ्यांना अल्ला-हू-अकबरचा नारा देणाऱ्या मुलीला घेराव घालायचा नव्हता. ती जेव्हा घोषणा देत होती तेव्हा मुलीच्या आसपास कोणीही नव्हते. मग तिला कोणी भडकावले? आम्ही कॉलेजमध्ये ‘अल्लाह-हू-अकबर’ आणि ‘जय श्री राम’च्या घोषणांचा प्रचार करू शकत नाही.’

लालू यादव म्हणाले – मोदींच्या राजवटीत देश गृहयुद्धाकडे जातोय

कर्नाटकच्या हिजाब वादावर राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे वक्तव्य आले आहे. लालू म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश गृहयुद्धाकडे जात आहे. ते महागाई, गरिबीवर बोलत नाहीत तर अयोध्या आणि वाराणसीबद्दल बोलत आहेत. भाजपची हतबलता दर्शवते की ते यूपीच्या निवडणुकीत पराभूत होतील. ते फक्त दंगली आणि मंदिरांबद्दल बोलत आहेत. 70 वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी इंग्रजांना देश सोडून जाण्यास भाग पाडले, पण आता भाजपच्या रूपाने इंग्रज परत आले आहेत. यूपी निवडणुकीत आमचा सपाला पाठिंबा आहे.

हेमा मालिनी म्हणाल्या – शाळेच्या बाहेर जे पाहिजे ते घाला

कर्नाटकच्या हिजाब वादावर मथुरेतील भाजप खासदार हेमा मालिनी म्हणाल्या की, शाळा या शिक्षणासाठी आहेत आणि तेथे धार्मिक बाबी आणू नयेत. प्रत्येक शाळेत एक गणवेश असतो ज्याचा आदर केला पाहिजे. शाळेच्या बाहेर तुम्हाला हवे ते घालता येते.

प्रियांका म्हणाल्या – मुलींनी बिकिनी घालावी किंवा हिजाब, हा त्यांचा अधिकार आहे

दुसरीकडे, उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी प्रियांका गांधी यांनी ‘लडकी हूं, लड सकती हूं’ या हॅशटॅगसह महिलांना त्यांचा पोशाख ठरवण्याचा अधिकार घटनेत मिळाला आहे, असे लिहिले आहे. त्यांनी याची पर्वा करू नये. संविधानाने महिलांना त्यांचा पेहराव ठरवण्याचा अधिकार दिला आहे. ती तिला पाहिजे ते घालू शकते… मग ती बिकिनी असो वा बुरखा, जीन्स असो किंवा हिजाब.. महिलांचा छळ करणे थांबवा.”

Hijab Controversy : People banned from gathering within 200 meters of school-college in Bangalore, High Court sends case to Upper bench

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात