रयत शिक्षण संस्थेच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, केवळ ३० रुपये व 4 विद्यार्थी घेऊन सुरु झालेल्या रयत शिक्षण संस्थेत आज साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.Higher and Technical Education Minister Uday Samant: Other institutions should follow the example of Rayat Shikshan Sanstha with Bhushan
विशेष प्रतिनिधी
सातारा : रयत शिक्षण संस्था ही बहुजनांची संस्था असून, नियमानुसार चालणारी आहे. ती महाराष्ट्रातील आदर्शवत संस्था आहे. रयतेने नेहमी समानतेचा स्वीकार केला आहे. रयत शिक्षण संस्थेत सर्वसामान्यांची मुले शिकत आहेत. या शिक्षण संस्थेत काळाच्या गरजेनुसार कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासोबतच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलांना रोजगारही उपलब्ध करुन दिला जात आहे. ही संस्था देशाचे भूषण असून या संस्थेचा आदर्श देशातील इतर संस्थांनी घ्यावा, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.
यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ यासन्स येथे रयत शिक्षण संस्थेचा 102 वा वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.रयत शिक्षण संस्थेच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, केवळ ३० रुपये व 4 विद्यार्थी घेऊन सुरु झालेल्या रयत शिक्षण संस्थेत आज साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
यावेळी बोलताना सामंत म्हणाले, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील काम अमुल्य असे आहे. या संस्थेत साडेचार लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचे काम आदर्शवत असून संस्थेसाठी शासनाकडून सर्व सहकार्य करण्यात येईल. देशातील विद्यार्थी बाहेरील देशातील विद्यापीठ पाहण्यासाठी, तेथे शिक्षण घेण्यासाठी जातात.
भविष्यात रयत शिक्षण संस्था पाहण्यासाठी बाहेरील विद्यार्थी इथे येतील, तसेच मुंबई, पुणे येथील विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी येतील असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला. सामंत यांच्या हस्ते रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन व ई-रयत ॲपचा शुभारंभ करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App