वृत्तसंस्था
नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाल यांच्या घरावर आणि कार्यालयांवर अशा 36 ठिकाणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापे घातले आहेत. हिरो मोटोकॉर्पच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांवर देखील छापे घालण्याचे आले आहेत. या विषयीचे तपशील अद्याप बाहेर आलेले नाहीत.मात्र याचा परिणाम म्हणून हिरो मोटोकॉर्पचे आणि अन्य वाहन कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. पवन मुंजाल यांच्यावर आर्थिक अनियमिततेचा आरोप आहे.Hero MotoCorp IT: Income tax raids at 36 places including Pawan Munjal’s house; Big hit to “Hero” shares
कारवाई अद्याप सुरूच
हिरो मोटोकॉर्प ही जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी 40 हून अधिक देशांमध्ये आपला व्यवसाय करते. हिरो मोटोकॉर्प आशिया, आफ्रिका, अमेरिका यांसारख्या देशांमध्येही आहे.
हिरो मोटोकॉर्पचे शेअर घसरले
भारतात विकल्या गेलेल्या सर्व दुचाकींपैकी 50 % हिरो मोटोकॉर्पच्या आहेत. कंपनीने जारी केलेल्या माहितीनुसार, हिरो मोटोकॉर्पचा एकूण नफा ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 36.7 % घसरून 686 कोटी रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, अगदी वर्षभरापूर्वी याच तिमाहीत हिरो मोटोकॉर्प नफा 1084.47 कोटी रुपये होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीने कामकाजातून 7883 कोटी रुपये कमावले होते. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 9776 कोटी रुपये होते. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीच्या कमाईत 19.4 % घट झाली आहे.
शेअर 2380 रूपयांच्या खाली
मुंजाल यांच्यावरील इन्कम टॅक्स धाडीच्या वृत्तामुळे शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. कंपनीचे शेअर 2380 रुपयांच्या खाली आले असून नफा 2 % घसरला आहे. त्याचबरोबर वाहन क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या शेअर्सवरही दबाव आहे. मारुती, बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर 1.5 %पर्यंत घसरले आहेत. हिरो मोटोकॉर्पचे शेअर गेल्या एका आठवड्यात 1 टक्क्यांनी घसरले आहेत
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App