हेमंत सोरेन यांनी EDच्या आठव्या समन्सला दिले उत्तर, म्हणाले…

ईडीने हेमंत सोरेन यांना १३ जानेवारीला पत्र लिहून इशारा दिला होता.


विशेष प्रतिनिधी

रांची : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एक पत्र पाठवून तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) आठव्या समन्सला उत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी ईडीच्या टीमला रांचीला बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी एका पत्राद्वारे तपास यंत्रणेला 20 जानेवारीला शासकीय निवासस्थानी येऊन चौकशी करण्यास सांगितले आहे.Hemant Soren replied to EDs eighth summons



ईडीने हेमंत सोरेन यांना १३ जानेवारीला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, १६ ते २० जानेवारी दरम्यान जर ते एजन्सीसमोर हजर झाले नाहीत, तर त्यांना स्वत: त्यांच्याकडे यावे लागेल. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आव्हाने निर्माण होऊ शकतात, असेही ईडीने म्हटले आहे. ही जबाबदारी तुमची असेल त्यामुळे तुम्ही राज्याचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य त्या सूचना द्याव्यात.

काय प्रकरण आहे

रांचीच्या बडगई भागातील जमिनीशी संबंधित सरकारी कागदपत्रांमध्ये छेडछाड आणि बनावटगिरीच्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात ईडीला मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे म्हणणे नोंदवायचे आहे. या प्रकरणी ईडीने यापूर्वीच आयएएस छवी रंजनसह पंधरा पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे. आता हेमंत सोरेन यांची या प्रकरणातील भूमिकेबाबत अनेक मुद्द्यांवर चौकशी करायची आहे.

Hemant Soren replied to EDs eighth summons

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात