Uttarkashi Uttarakhand : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले ; पाच ठार, दोन जखमी

Uttarkashi Uttarakhand

हे हेलिकॉप्टर डेहराडूनहून हर्सिलला निघाले होते.


विशेष प्रतिनिधी

डेहराडून: Uttarkashi Uttarakhand उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी आहे. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातावेळी या हेलिकॉप्टरमध्ये ७ जण होते असे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर डेहराडूनहून हर्सिलला निघाले होते. या अपघातामागील कारण सध्या तपासले जात आहे.Uttarkashi Uttarakhand

या घटनेची माहिती मिळताच उत्तरकाशी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. या अपघातात जखमी झालेल्या लोकांना वाचवण्यात आले आहे. या घटनेत जखमी झालेल्या दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचीही ओळख पटवली जात आहे.



हेलिकॉप्टर अपघातामागील कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. अपघातापूर्वी काही तांत्रिक बिघाड झाला होता का, याचा तपास पथक शोधण्याचा प्रयत्न करत आहे. हेलिकॉप्टरच्या ब्लॅक बॉक्सचाही शोध सुरू आहे. ब्लॅक बॉक्सवरून हेलिकॉप्टर अपघातापूर्वी झालेल्या बिघाडाबाबत सांगता येते.

Helicopter crashes in Uttarkashi Uttarakhand five killed two injured

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात