वृत्तसंस्था
डेहराडून : उत्तराखंडमध्ये पावसाने रौद्ररुप धारण केले असून महापुराने हाहाकार माजविला आहे. सलग चार दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेअनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आतापर्यत ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. Heavy Rains in Uttarakhand, Flood in many parts; Many villages lost contact: 47 killed
मंगळवारी ४२ लोकांचा बळी गेला असून बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण केले आहे. अनेकजण ढिगाऱ्याखाली सापडल्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यसरकार तसेच लष्कराकडून बचाव कार्य वेगाने सुरु आहे. लोकांना सुरक्षित स्थळी पोचविण्यात येत आहे. सोमवारी पाच जणांचा जीव गेला होता. कुमाऊ भागामध्ये ढगफुटी आणि भूस्खलनानंतर अनेक लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केल.अनेक गावांचा पावसामुळे संपर्क तुटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. तसेच केंद्राकडूनमदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
आपत्तीग्रस्त भागांची घटनास्थळी पाहणी केल्यानंतर, सर्किट हाऊस, काठगोदाम येथे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेताना, त्यांना संपूर्ण समर्पण आणि तत्परतेने मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीडितांना सर्व शक्य मदत केली जात आहे आणि त्यांना आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत. -पुष्कर सिंह धामी, मुख्यमंत्री, उत्तराखंड
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App