विशेष प्रतिनिधी
चेन्नई – तमिळनाडूत गेल्या तीन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. राज्यात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.Heavy rain in Tamilnadu
ऑक्टोबरच्या सुरवातीपासूनच आतापर्यंत तमिळनाडूत सरासरी आणि चेन्नईत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. त्याचवेळी चेन्नई आणि लगतच्या जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून रविवारपर्यंत मुसळधार पाऊस पडला. परिणामी परिसरातील जलप्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात आले. पावसामुळे विविध ठिकाणी तब्बल ६०० झोपड्या पाण्याखाली गेल्या आहेत.
पूरग्रस्त भागात मदतकार्य वेगाने सुरू असून आज मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तमिळनाडूत चौदा जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवसांपर्यंत ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याने चौदा नोव्हेंबरपर्यंत निलगिरी, कोइमतूर, डिंडिगुळ, थेनी, तेनकासी, तिरुनेलवेलीसह चौदा जिल्ह्यात सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मच्छीमारांना नऊ ते १२ नोव्हेंबरपर्यंत समुद्रात न जाण्याची सूचना केली आहे. ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनचे हजारो कर्मचारी मदतकार्यात सहभागी झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App