वृत्तसंस्था
चेन्नईः दक्षिण भारतात मागील अनेक दिवसांपासून पावसाचा कहर सुरूच आहे. बहुतेक भागांमध्ये पूर आला आहे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार (IMD), 1 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान या दक्षिण भारतात 63 % अतिरिक्त पाऊस झाला आहे. तर, 1 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान पुर्ण भारतात 143.4% अधिक पावसाची नोंद झाली. भारतीय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून तामिळनाडू, पुडुचेरी, केरळसाठी विशेष पूर सूचना (Special Flood Advisory) जारी करण्यात आली आहे. आणि रेड अलर्ट जारी केला आहे. Heavy rain expected in Tamil Nadu, Andhra Pradesh today; IMD issues red alert
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये 24 नोव्हेंबरपर्यंत 3523.3 मिमी पाऊस पडला आहे. हा पाऊस 2018 च्या तुलनेत थोडा जास्त आहे, जेव्हा राज्यात भीषण पूर आणि प्रचंड नुकसान झाले होते. यंदा हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूंमध्ये पाऊस दक्षिण भारतात पाऊस झालाय. जानेवारी, मार्च, एप्रिल, मे, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या सात महिन्यांत जास्त पाऊस झाला आहे.
सक्रिय ईशान्य मान्सूनमुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये वारंवार पाऊस पडत आहे, असे IMD चे महासंचालक एम महापात्रा म्हणाले. गेल्या आठवड्यात, पुरामुळे तिरुमला, तिरुपतीमध्ये शेकडो यात्रेकरू अडकले होते. पुरामुळे मूर्ती पाण्याखाली गेल्याने मंदिर परिसरात भीषण स्थिती होती. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. विमान आणि रेल्वे सेवा प्रभावित झाली. तिरुपतीचे रहिवासी सोशल मीडियावरलोकांना तिरुपतीचा प्रवास रद्द करण्याचे आवाहन करत होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App