विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा जबर तडाखा बसला आहे. दुसरीकडे त्रिपुरामध्ये अचानक पूरस्थिती निर्माण झाल्याने दोन हजार लोकांना शिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे.Heat wave in North India
ईशान्येकडील राज्यांना अतिवृष्टीने झोडपून काढले असून रस्ते आणि ऊर्जा पुरवठा करणारी यंत्रणा आणि पिकांचेही यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर पंजाब आणि हरियानामध्ये ४० डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. राजस्थानातील चुरू येथील पारा ४३.७ अंशांवर गेला होता, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
हरियानातील गुडगाव येथे ४३.५ अंश एवढ्या तापमानाची नोंद झाली. हा भाग दिल्ली परिसरामध्ये येतो.दिल्लीवर काळे ढग दाटल्याने थंड वारे वाहू लागले होते, यामुळे उष्णतेमध्ये होरपळणाऱ्या राजधानीवासीयांना मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान हा दिलासाही फार काळ टिकण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पश्चिहम बंगाल, सिक्कीम, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांमध्ये अनेक ठिकाणांवर पाऊस पडला. या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App