वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आज अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी होणार आहे. या अशा बाबी आहेत ज्या सामान्य लोकांशी संबंधित आहेत. आजच्या सुनावणीकडे आणि निकालाकडे सर्वांचे लक्ष असेल. सुप्रीम कोर्टात आज कोणत्या केसेसवर सुनावणी होणार आहे हे पाहुया.
1. धार्मिक स्थळांच्या सद्य:स्थितीबाबत
सर्व धार्मिक स्थळांचा सध्याचा दर्जा कायम ठेवण्याच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकांमध्ये असे म्हटले आहे की, 1991च्या प्रार्थना स्थळांचा कायदा 15 ऑगस्ट 1947 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांचा दर्जा कायम ठेवण्यास सांगतो. ते हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन समाजाच्या विरोधात आहे. त्यामुळे ज्या पवित्र स्थळांवर परकीय आक्रमकांनी बळजबरीने मशीद बांधली, त्या पवित्र स्थळांवर ते हक्क सांगू शकले नाहीत. यावर केंद्र सरकारने उत्तर द्यावे.
2. पुरुषांच्या घटस्फोटाच्या एकतर्फी अधिकाराचे प्रकरण
मुस्लिम पुरुषांना तलाकचा एकतर्फी अधिकार देणार्या तलाक-ए-हसन आणि तलाक-ए-एहसानला आव्हान देणाऱ्या याचिकांवरही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने या तरतुदींच्या वैधतेवर सुनावणी करणार असल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर याचिकाकर्त्या महिलांना वैयक्तिकरित्याही दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे न्यायालयाने दोन्ही याचिकाकर्त्या महिलांच्या पतींना आज न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
3. अनिल देशमुखांच्या जामिनावर
मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मिळालेल्या जामीनाविरोधात ईडीच्या अपिलावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुमारे वर्षभर कारागृहात असलेल्या देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, उच्च न्यायालयानेही 12 ऑक्टोबरपर्यंत ईडीला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची संधी देत देशमुख यांच्या सुटकेला स्थगिती दिली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App