प्रतिनिधी
भिवंडी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी शनिवारी महाराष्ट्रातील भिवंडीत होण्याची शक्यता आहे. महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचा आरोप राहुल यांनी केला होता.Hearing of another defamation case against Rahul Gandhi, alleging RSS involvement in Gandhi’s murder
यापूर्वी, भिवंडी शहर न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या खटल्यावरील सुनावणी आणि त्यांच्या हजेरीतून कायमस्वरूपी सूट मिळण्याच्या अर्जावरील सुनावणी 1 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली होती. राहुल गांधींचे वकील नारायण अय्यर यांनी सांगितले की, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एल.सी. वाडीकर यांच्या न्यायालयात हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट देण्याचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक पदाधिकारी राजेश कुंटे यांनी 2014 मध्ये ठाण्यातील भिवंडी भागात राहुल गांधी यांचे भाषण ऐकल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचा आरोप राहुल गांधींनी भाषणात केला होता.
सुरतच्या न्यायालयाने 23 मार्च रोजी सुनावली होती शिक्षा
याआधी, 23 मार्च रोजी गुजरातच्या सुरत न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्यांना 27 मिनिटांनी जामीनही मिळाला. 2019 मध्ये त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी आडनावाबाबत त्यांनी वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते – सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते? यानंतर गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App