Hazratbal : हजरतबल येथील राष्ट्रीय चिन्हावरील टिप्पणीवरून राजकीय वाद; भाजपकडून काँग्रेसवर हल्लाबोल

Hazratbal

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Hazratbal  जम्मू-काश्मीरमधील पवित्र हजरतबल परिसरातील राष्ट्रीय चिन्हाची झालेली विटंबना आणि त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार तारिक अन्वर यांनी दिलेल्या विधानामुळे नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. अन्वर यांनी “जे झालं ते झालं” असे उद्गार काढले. या वक्तव्यामुळे भाजपने काँग्रेसवर तीव्र हल्लाबोल करत राहुल गांधींनाही थेट लक्ष्य केले आहे.Hazratbal

भाजप प्रवक्ता गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “राष्ट्रीय चिन्ह हा देशाच्या सार्वभौमत्वाचा आणि अभिमानाचा प्रतीक आहे. त्याची झालेली विटंबना ही अत्यंत गंभीर बाब आहे. मात्र काँग्रेस खासदाराने ती सहजतेने झटकून टाकणे हा जनतेच्या भावना दुखावणारा प्रकार आहे. राहुल गांधी यांनी स्पष्ट करावे की अन्वर यांचे विधान हे काँग्रेसचे अधिकृत मत आहे का?”Hazratbal



भाजपच्या इतर नेत्यांनीही सोशल मीडियावर काँग्रेसला धारेवर धरले. “ज्या पक्षाने स्वातंत्र्यानंतर देश चालवला, त्यांच्याकडून राष्ट्रीय प्रतीकांचा इतका अनादर होणे लाजिरवाणे आहे,” अशी टीका करण्यात आली.

श्रीनगरमधील हजरतबल दर्ग्याच्या परिसरात बसविण्यात आलेल्या राष्ट्रीय चिन्हाचे नुकसान झाल्याची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाली होती. या छायाचित्रांनंतर जम्मू-काश्मीरसह देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. घटनेची गंभीर दखल घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले असून, जम्मू-काश्मीर प्रशासनाला तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

वाद वाढल्यानंतर काँग्रेसने बचावात्मक भूमिका घेतली. पक्षातील सूत्रांनी सांगितले की तारिक अन्वर यांचे वक्तव्य वेगळ्या संदर्भात होते. त्यांचा उद्देश राष्ट्रीय चिन्हाच्या विटंबनेला किरकोळ दाखविण्याचा नव्हता. तथापि, भाजपने काँग्रेसची ही सफाई फेटाळून लावत “हा पक्ष जनतेच्या भावनांपासून दुरावलेला आहे” असा आरोप केला.

Hazratbal National Symbol Issue: Congress-BJP face off over Tariq Anwar’s statement

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात