हरियाणात भाजपचे सोशल इंजिनिअरिंग; का केले प्रदेशाध्यक्ष नायब सिंग सैनी यांना नवे मुख्यमंत्री??

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणात अत्यंत वेगवान राजकीय घडामोडी घडवून आणत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने तिथे नवे सोशल इंजिनिअरिंग अंमलात आणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष नायब सिंह सैनी यांना नवे मुख्यमंत्री केले. सायंकाळी 5.00 वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी राजभवनावर होणार आहे. निवर्तमान उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे संबंध संपुष्टात आले आहेत. Haryana BJP president Nayab Singh Saini to be next CM of Haryan

हरियाणा मध्ये मनोहर लाल खट्टर यांनी आज सकाळीच तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. त्यामध्ये सर्वसंमतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कुरुक्षेत्रचे खासदार नायब सिंह सैनी यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदाचे शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्या रूपाने प्रथमच सैनी या ओबीसी समाजातील नेत्याला हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची संधी मिळत आहे.

हरियाणात गुजरात सरकार संपूर्ण मंत्रिमंडळ प्रकरणाच्या प्रयोग करण्यात येण्याची शक्यता असून नायब सिंह सैनी यांच्या शपथविधी मध्ये किंवा त्यानंतर राज्याचे सगळेच मंत्री बदलले जाण्याची शक्यता आहे. मनोहर लाल खट्टर यांना लोकसभा निवडणुकीत तिकीट देऊन भाजप केंद्राच्या राजकारणात आणण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वांचे नाव आणलेले कर्नालचे खासदार संजय भाटिया यांनी देखील या बातमीला दुजोरा दिला. नव्या मंत्रिमंडळाची रचना नवी मुख्यमंत्री भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी विचारविनिमय करूनच निश्चित करतील. त्यामध्ये संपूर्ण बदल होईल की जुने मंत्री कायम ठेवले जातील??, हा सर्वाधिकार मुख्यमंत्री आणि भाजप श्रेष्ठींना आहे. ते योग्य वेळेला सगळ्यांना समजेल, असे संजय भाटिया यांनी स्पष्ट केले.

Haryana BJP president Nayab Singh Saini to be next CM of Haryan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात