हर हर महादेव, वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमांवर संभाजीराजेंचा तीव्र आक्षेप; निर्मात्यांना इशारा

प्रतिनिधी

पुणे : हर हर महादेव, वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमांवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या दोन सिनेमांमध्ये इतिहासाचा विपर्यास केल्याचा आरोप केला आहे. Har Har Mahadev, Vedat Maratha Veer Daudle Sambhaji Raj’s intense focus on seven films

या पत्रकार परिषदेत संभाजी राजे यांनी या सिनेमातले काही फोटो दाखवून त्यातल्या आक्षेपार्ह बाबी दाखविल्या. कोणाच्याही डोक्यावर पगडी नाही. पगडी काढणे म्हणजे तो शोकसंदेश असतो, त्याचे देखील गांभीर्य निर्मात्यांना नाही, असा आक्षेप संभाजी राजे यांनी घेतला आहे. या पत्रकार परिषदेला त्यांच्याबरोबर संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड उपस्थित होते.

हर हर महादेव हा सिनेमा रिलीज झाला आहे, तर वेडात मराठे वीर दौडले सात हा सिनेमा रिलीज व्हायचा आहे. हर हर महादेव सिनेमा आपण अद्याप पाहिला नसल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. पण तो पाहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इतिहासाचे सिनेमे जरूर काढावेत पण त्यासाठी भालजी पेंढारकरांचा आदर्श घ्यावा. त्याला आपण जरूर पाठिंबा देऊ. चांगला सिनेमा काढला तर निर्माता, दिग्दर्शक अभिनेत्यांची पाठ थोपटू. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास सहन करणार नाही. इतिहासाचा विपर्यास कराल तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला.

त्याचवेळी त्यांनी हा समाजाचाही दोष असल्याचे स्पष्ट केले. आपण इतिहासाची पुस्तके वाचत नाही. वा. सी. बेंद्रे, मेहेंदळे, जयसिंगराव पवार यांच्यासारख्या इतिहासकारांनी आयुष्य इतिहास संशोधनात घातले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लिहिला. ती पुस्तके आपण वाचली पाहिजेत. केवळ सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचा विपर्यास सहन करता कामा नये. आपणही तो करणार नाही. इतिहासाचा विपर्यास सहन केला, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात जन्म घेऊन आमचा उपयोग काय?, असा सवाल संभाजीराजे यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणीही कोणत्याही अभिनेत्याने करावी. त्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. पण इतिहासाचा विपर्यास करणारी भूमिका असेल तर अक्षय कुमार असो किंवा कोणीही असो आपण त्याविरुद्ध भूमिका घेऊ, असे संभाजी राजे यांनी स्पष्ट केले आहे.

इतिहासावर आधारित सिनेमे जरूर निघावेत परंतु त्यासाठी सेन्सॉर बोर्डावर इतिहास तज्ञांची समिती असावी, अशी सूचना आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात आवश्यक तर पत्र व्यवहार देखील करू. परंतु, कोणत्याही स्थितीत इतिहासाचा विपर्यास सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Har Har Mahadev, Vedat Maratha Veer Daudle Sambhaji Raj’s intense focus on seven films

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात