हमीरपुरजनपदस्य राठतहसीलस्य : हमीरपुरच्या जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांचा संस्कृत मधून निकाल!!

प्रतिनिधी

नाशिक : उत्तर प्रदेशातील हमीरपूरचे जिल्हा न्यायदंडाधिकारी डॉ. चंद्रभूषण त्रिपाठी यांनी एका जमिनीचा खटला चालवून त्याचा निकाल संस्कृत भाषेतून दिला आहे. सर्वसामान्यपणे हिंदी अथवा इंग्रजीतून जे निकाल देण्यात येतात, तो निकाल जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी संस्कृत भाषेतून दिला आहे. हा निकाल डॉ. त्रिपाठी यांनी केवळ तोंडी संस्कृत भाषेतून दिला नसून त्याचा चार पानी लेखी आदेश देखील संस्कृत मधून दिला आहे. संबंधित वकिलांनी हे आदेश भाषांतरकाराकडून समजून घेतले आहेत. Hamirpur District Magistrate Result in Sanskrit

हमीरपूरचे जिल्हा न्याय दंडाधिकारी डॉ. चंद्रभूषण त्रिपाठी हे संस्कृत मध्ये पीएचडी आहेत. हमीरपूर जिल्ह्यातील राठ तालुक्यातील कुम्हरिया या गावातील अनुसूचित जातीचे एक शेतकरी करण सिंह यांच्या जमीन व्यवहाराशी संबंधित हा निकाल त्यांनी संस्कृत भाषेतून दिला आहे. करण सिंह यांनी आपली जमीन विकण्याची परवानगी मागितली होती, ती परवानगी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिली आहे.

डॉ. चंद्रभूषण त्रिपाठी यांनी निकाल पत्राचे वाचन संस्कृत मधून सुरू केल्यानंतर सुरुवातीला तिथे उपस्थित असलेले वकील आणि पक्षकार अचंबित झाले. परंतु नंतर मात्र त्यांनी दिलेल्या निर्णयाबरोबरच न्यायदंडाधिकाऱ्यांच्या संस्कृत भाषेच्या प्रेमाविषयी देखील त्यांनी कौतुक व्यक्त केले.

संस्कृत भाषेत केसचा निकाल देऊन हमीरपूरच्या जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांनी इतिहास रचला आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश शर्मा यांनी व्यक्त केली आहे. जेव्हा सरकारी कामकाजात संस्कृत भाषेला अशा पद्धतीचे प्राधान्य मिळेल तेव्हा संस्कृत विषयाची रुची जनसामान्यांमध्ये वाढू शकेल, असे दिनेश शर्मा म्हणाले.

Hamirpur District Magistrate Result in Sanskrit

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात