हाल-ए-पाकिस्तान : इम्रान खानच नव्हे, पाकिस्तानात याआधी 7 माजी पंतप्रधानांना झाली होती अटक, एकाला तर झाली फाशी

प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश पाकिस्तान सध्या सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानमधील राजकीय संकट अधिक गडद झाले आहे. अटकेनंतर खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे समर्थक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हिंसाचार सुरू केला आहे.Hal-e-Pakistan Not only Imran Khan, 7 former Prime Ministers were arrested in Pakistan, one was hanged.

पण पाकिस्तानच्या राजकारणात ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा देशाच्या माजी पंतप्रधानाला अशा प्रकारे अटक करण्यात आली आहे. याआधीही पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांवर वेळोवेळी हा कारवाई झालेली आहे.



हुसेन शहीद सुहरावर्दी

पाकिस्तानचे कायदे-ए-आझम मोहम्मद अली जिना यांच्या जवळचे हुसेन शहीद हे देशाचे पाचवे पंतप्रधान होते. सप्टेंबर 1956 ते ऑक्टोबर 1957 पर्यंत ते पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यांनी जनरल अयुब खान यांच्या सरकारला पाठिंबा देण्यास नकार दिला. यानंतर इलेक्टोरल बॉडीज डिसक्वॉलिफिकेशन ऑर्डर (EBDO) द्वारे त्यांना राजकारणात बंदी घालण्यात आली. पण नंतर जुलै 1960 मध्ये कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. कोणत्याही खटल्याशिवाय त्यांना अटक करून कराचीच्या मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले.

झुल्फिकार अली भुट्टो

झुल्फिकार अली भुट्टो यांनी ऑगस्ट 1973 ते जुलै 1977 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून काम केले. 1974 मध्ये राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून त्यांना सप्टेंबर 1977 मध्ये अटक करण्यात आली होती. नंतर लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ख्वाजा मोहम्मद अहमद समदानी यांनी त्यांच्या अटकेचा कोणताही आधार नसल्याचे सांगून त्यांची सुटका केली. पण मार्शल लॉ रेग्युलेशन 12 अन्वये तीन दिवसांनी त्याला पुन्हा अटक करण्यात आली. 4 एप्रिल 1979 रोजी त्यांना फाशी देण्यात आली.

बेनझीर भुट्टो

बेनझीर भुट्टो या दोन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान झाल्या. डिसेंबर 1998 ते ऑगस्ट 1990 आणि पुन्हा ऑक्टोबर 1993 ते नोव्हेंबर 1996 या काळात त्या पहिल्यांदा देशाच्या वजीर-ए-आझम होत्या. आपल्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी त्या ऑगस्ट 1985 मध्ये पाकिस्तानात आल्या होत्या. मात्र त्यांना 90 दिवस नजरकैदेत ठेवण्यात आले. पुढच्याच वर्षी 1986 मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त कराचीतील रॅलीत सरकारवर टीका केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना 1999 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर त्या 7 वर्षे वनवासात राहिल्या. मात्र 2007 मध्ये त्या देशात परतल्यानंतर आत्मघातकी हल्ल्यात त्यांची हत्या झाली.

युसूफ रझा गिलानी

युसूफ रझा गिलानी 2008 मध्ये आघाडी सरकारचे पंतप्रधान होते. भ्रष्टाचारप्रकरणी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. बनावट कंपन्यांच्या नावाने पैशांचा व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. 2012 मध्ये त्यांना पदावरून हटवावे लागले होते.

नवाझ शरीफ

कारगिल युद्धानंतर 1999 मध्ये नवाझ शरीफ यांना सत्ता गमवावी लागली होती. ते तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. परवेझ मुशर्रफ सरकारच्या काळात नवाझ शरीफ यांना दहा वर्षांसाठी हद्दपार व्हावे लागले. पाकिस्तानात परतल्यावर, त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्या उर्वरित निर्वासनासाठी सौदी अरेबियाला पाठवण्यात आले.

शाहिद खाकान अब्बासी

शाहिद खाकान अब्बासी हे जानेवारी 2017 ते मे 2018 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. जुलै 2019 मध्ये NAB टीमने त्यांना अटक केली होती. 2013 च्या एलएनजी आयात करारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. ज्या वेळी ही कंत्राटे देण्यात आली, त्यावेळी अब्बासी पेट्रोलियम मंत्री होते. त्यांना फेब्रुवारी 2020 मध्ये जामीन मिळाला.

इम्रान खान

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 9 मे 2023 रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना NAB आणि पाक रेंजर्सनी अटक केली. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी अनेक शहरांमध्ये निदर्शने केली. यादरम्यान हिंसाचाराच्या घटनाही समोर आल्या.

Hal-e-Pakistan Not only Imran Khan, 7 former Prime Ministers were arrested in Pakistan, one was hanged.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात