विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : vote chori सारखे शब्द वापरून संपूर्ण मतदान प्रक्रियेविषयीच संपूर्ण देशभर भ्रम कसा फैलावला जातो, याचे राजकीय इंगित मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत समजावून सांगितले. निवडणूक कायद्यातल्या बारकाव्यांसह त्यांनी उदाहरण पेश केले.
मतदार यादी आणि ती बनवण्याची प्रक्रिया निवडणूक अधिनियम 1950 नुसार सुरू असते. ती निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्या उलट निवडणूक अधिनियम 1951 नुसार कुठल्याही निवडणुकीत मतदार एकदाच मतदान करू शकतो. त्यामुळे निवडणूक मतदार यादी आणि निवडणुकीतले प्रत्यक्ष मतदान या कायदेशीर दृष्ट्या भिन्न भिन्न बाबी आहेत. मात्र त्यांचे political mixing करून vote chori सारख्या शब्दातून भ्रम फैलावला जातो, अशा स्पष्ट शब्दांमध्ये निवडणूक आयुक्त ज्ञानेश्वर कुमार यांनी देशात सध्या सुरू असलेल्या सगळ्यात महत्त्वाच्या वादाबद्दल सटीक भाष्य केले.
#WATCH | Delhi: Chief Election Commissioner Gyanesh Kumar says, "I want to appeal to all the 12 political parties, whether they are national parties or state parties, should point out the mistakes in it (draft list) before 1 September. The Election Commission is ready to correct… pic.twitter.com/G9Xfd9ehsm — ANI (@ANI) August 17, 2025
#WATCH | Delhi: Chief Election Commissioner Gyanesh Kumar says, "I want to appeal to all the 12 political parties, whether they are national parties or state parties, should point out the mistakes in it (draft list) before 1 September. The Election Commission is ready to correct… pic.twitter.com/G9Xfd9ehsm
— ANI (@ANI) August 17, 2025
कुठलाही मतदार कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदार यादीत नाव असल्याशिवाय मतदान करू शकत नाही आणि जे मतदान करतो, ते एकदाच करतो, हे जर उघड सत्य असेल, तर व्होट चोरी होणे शक्य नाही. कारण मतदान करणे हा मतदाराचा हक्क असेल आणि ते कर्तव्य तो बजावत असेल, तर त्याला मतदान चोरी या शब्दांनी कशी नावे ठेवता येतील??, असा सवाल ज्ञानेश्वर कुमार यांनी केला.
त्याच वेळी ज्ञानेश्वर कुमार यांनी देशातल्या 12 राष्ट्रीय पक्षांना मतदार यादीतल्या चुका स्पष्टपणे निवडणूक आयोगाला सांगण्याचे आवाहन केले. राजकीय पक्षांनी सांगितलेल्या चुका 1 सप्टेंबर पर्यंत सांगाव्यात. त्या सर्व चुका सुधारण्यासाठी निवडणूक आयोग तयार आहे. परंतु, त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्यामुळे लगेच मतदार यादीतल्या चुका दुरुस्त करणे शक्य होणार नाही. त्यामुळे 1 सप्टेंबर च्या आतच ज्या चुका राजकीय पक्ष सांगतील त्या चुका निवडणूक आयोग दुरुस्त करेल, असे ज्ञानेश्वर कुमार यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App