आरोपी बलराज गिल याला कोलकाता विमानतळावरून अटक करण्यात आली होती. Gurugram Murder Body of model Divya Pahuja found in canal after 11 days
विशेष प्रतिनिधी
गुरुग्राम : गुरुग्राममधील प्रसिद्ध मॉडेल दिव्या पाहुजा हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी बलराजच्या जबाबवरून मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह ११ दिवसांनंतर हरियाणाच्या तोहाना येथील कालव्यातून सापडला आहे. याप्रकरणी ६ टीम कार्यरत होत्या.
दिव्याच्या मृतदेहाचा फोटो तिच्या कुटुंबीयांना पाठवण्यात आला असून, त्यानंतर कुटुंबीयांनी तिची ओळख पटवली आहे. दिव्याचा मृतदेह पंजाबमधील एका कालव्यात फेकून दिला होता. मृतदेह वाहून हरियाणातील या कालव्यात पोहोचला. पोलिसांनी पंजाब ते हरियाणा या मार्गाचा तपास केला, त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
कालव्यात मृतदेह फेकणाऱ्या आरोपीलाही पोलीस आज गुरुग्रामला आणत आहेत. आरोपी बलराज गिल याला कोलकाता विमानतळावरून अटक करण्यात आली होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममधून एका मॉडेलची गोळ्या झाडून हत्या झाल्याची बातमी आली. दिव्या पाहुजा असे मॉडेलचे नाव आहे. ती गुंड संदीप गडोलीची मैत्रीण होती.हत्येप्रकरणी मुख्य आरोपीसह 3 आरोपींना काही तासांतच अटक करण्यात आली. 56 वर्षीय अभिजीत सिंग, 28 वर्षीय हेमराज आणि 23 वर्षीय ओमप्रकाश अशी आरोपींची नावे आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App