वृत्तसंस्था
चंदिगड : Chandigarh Firm अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर खाडी देशांनी अण्वस्त्र हल्ल्यापासून वाचण्यासाठी तयारी सुरू केली आहे. बहरीनस्थित एका फार्मा लायझनिंग एजंटने चंदीगडमधील एका औषध कंपनीशी संपर्क साधला आहे. त्याने अण्वस्त्र आणीबाणीत उपयुक्त ठरणाऱ्या प्रुशियन ब्लू कॅप्सूलबाबत चौकशी केली आहे.Chandigarh Firm
कंपनीला विचारण्यात आले आहे की, ते १ कोटी कॅप्सूल बनवण्यास सक्षम आहेत का? तसेच विविध वयोगटातील लोकसंख्येसाठी किती डोस घ्यावा लागतो? अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. हे औषध डीआरडीओच्या तंत्रज्ञानावर आधारित असून शरीरातील किरणोत्सर्गी घटकांचा प्रभाव कमी करते. कंपनीच्या संचालक डॉ. वैशाली अग्रवाल यांनी सांगितले की, सध्या बोलणी सुरू आहे. जर हा व्यवहार निश्चित झाला, तर औषधांची ही खेप बहरीन, कुवेत, कतार आणि जॉर्डनमध्ये पुरवली जाईल.Chandigarh Firm
काय आहे प्रुशियन ब्लू आणि शरीरात ते कसे काम करते?
प्रुशियन ब्लू हे अण्वस्त्र हल्ला किंवा रेडिओलॉजिकल आपत्तीमध्ये वापरले जाणारे औषध आहे. शरीरात शिरलेल्या किरणोत्सर्गी सिझियम-१३७ आणि थॅलियमचा प्रभाव ते कमी करते. ही कॅप्सूल आतड्यांमध्ये या घटकांशी एकरूप होऊन त्यांना विष्ठेवाटे शरीराबाहेर काढून टाकते. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लियर इमर्जन्सीच्या महत्त्वपूर्ण औषधांत याचा समावेश.
अशी तयार केली कॅप्सूल
हे औषध डीआरडीओ लॅब आयएनएमएएस, दिल्लीच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. डीसीजीआयने भारतात उत्पादन आणि विपणनासाठी दोन कंपन्यांना परवाना दिला आहे. अहमदाबादमधील कंपनीकडे कच्चा माल, तर चंदीगडमधील कंपनीकडे उत्पादनाची जबाबदारी आहे.
पोटॅशियम आयोडाइडच्याही एक कोटी कॅप्सूलची मागणी
बहरीनच्या एजंटने पोटॅशियम आयोडाइडबद्दलही विचारणा केली आहे. याबाबतही कोट्यवधी टॅब्लेट्सची मागणी आहे. पोटॅशियम आयोडाइडचा वापर न्यूक्लियर इमर्जन्सीमध्ये थायरॉइड ग्रंथी सुरक्षितेसाठी, हायपरथायरॉइडीझमवर उपचारासाठी केला जातो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App