गुजरात विधानसभा निवडणुकीचे वाजले बिगूल; 1, 5 डिसेंबरला मतदान; 8 डिसेंबर 2022 ला मतमोजणी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होत असून 8 डिसेंबर 2022 रोजी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालांबरोबरच गुजरात विधानसभा निवडणुकीचेही निकाल लागणार आहेत. Gujrat assembly election bugle sounded

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा याआधीच करण्यात आली असून तेथे प्रचार देखील सुरू झाला आहे.

त्या पाठोपाठ गुजरात विधानसभा निवडणूक देखील घोषित झाली असून 1 आणि 5 डिसेंबर 2022 रोजी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे, तर 8 डिसेंबर 2022 रोजी दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल एकदम जाहीर होणार आहेत. निवडणूक संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 10 डिसेंबर 2022 रोजी संपुष्टात येणार आहे.

  • गुजरात विधानसभेच्या एकूण 182 जागा असून 89 मतदारसंघांमध्ये 1 डिसेंबरला, तर 93 मतदारसंघांमध्ये 5 डिसेंबरला मतदान होईल. त्यासाठी मतदान केंद्रांची संख्या 51,782 असणार आहे.
  • गुजरात विधानसभा निवडणुकीत 3,24,422 नवीन मतदार पहिल्यांदा मतदान करणार असून एकूण मतदान केंद्रांची संख्या 51,782 आहे.
  • संपूर्ण राज्यामध्ये 50% मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था असेल.
  • 51,782 एकूण मतदान केंद्रांपैकी 1274 मतदान केंद्रांचे प्रबंधन आणि सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे महिला कर्मचारी करतील.

Gujrat assembly election bugle sounded

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात