प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : अहमदाबाद पोलिस गुन्हे शाखा, महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांच्या संयुक्त कारवाईत 500 कोटी रुपयांचा ड्रग्जचा प्रचंड मोठा साठा जप्त करण्यात आला. रसायन कारखान्याच्या नावाखाली कोकेन, केटामाइन आणि मेफेड्रोन (एमडी) यासारख्या ड्रग्ज निर्मितीचे उद्योग पैठण आणि वाळूज औद्योगिक वसाहतीत सुरू होते. अहमदाबाद पोलिस व डीआरआयच्या पथकांनी पैठण एमआयडीसीतील महालक्ष्मी इंडस्ट्रीज, वाळूज येथील गीता केमिकल्स हे दोन कारखाने तसेच अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार जितेशकुमार प्रेमजीभाई हिनहोरिया (मूळ रहिवासी गुजरात, ह.मु. कांचनवाडी 45) याच्या अत्यंत आलिशान बंगल्यावर छापे मारले. यात एकूण 500 कोटी रुपयांचे ड्रग्ज व रसायने जप्त केले. यात 250 कोटींचे कोकेन, केटामाइन, एमडी हे अमली पदार्थ आणि अमली पदार्थ निर्मितीसाठी लागणारे 250 कोटी रुपयांचे 23 हजार लिटर रसायन डीआरआयने हस्तगत केले. रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.Gujarat Police action in Sambhajinagar, drugs worth 500 crore seized from a company in Paithan MIDC
याप्रकरणी हिनहोरिया आणि संदीप शंकर कुमावत (40, रा. वाळूज) यांना अटक करण्यात आली आहे.तर आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. महालक्ष्मी इंटरप्रायजेस आणि हिनहोरीया याच्या घरातून कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या कंपनीत रसायनांच्या आडून सर्रास अंमली पदार्थ तयार केले जात असल्याचे तपासात उघड झाले. मुंबई, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यासह परदेशात देखील त्याचा पुरवठा केला जात होता. काही दिवसांपूर्वी गुजरात पोलिसांना छत्रपती संभाजीनगर येथील एका कारखान्यात कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्ज मोठ्या प्रमाणात तयार होत असल्याची मिळाली होती. यानंतर अहमदाबादचे पोलिस उपायुक्त चैतन्य मांडलिक आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांनी दोन पथके तयार करून तपास सुरू केला. तपासादरम्यान ही माहिती सत्य आढळून आली. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील या कारखान्याची लिंक सापडली. यानंतर अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने डीआरआयची मदत घेत ही मोठी कारवाई केली.
संभाजीनगरात पैठण आणि वाळूज एमआयडीसीत एमडी आणि कोकेनसारखे अंमली पदार्थ बनवणे सुरु होते तसेच संभाजीगरात तयार होणाऱ्या अंमली पदार्थांची मुंबई, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशसह युरोप आणि दक्षिण अमेरिकी देशात बिनबोभाट तस्करी सुरू होती. मागील दोन वर्षांपासून एवढे रॅकेट सुरू असताना महाराष्ट्र पोलिसांना याची कुणकणही नव्हती. त्यामुळे गुजरात पोलिसांनी या ठिकाणी येऊन कारवाई करण्यासाठी अनेक अडचणी आल्या.
मुख्य आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
जितेशकुमार याला पोलिसांनी अटक करून चौकशीसाठी सिडको येथील डीआरआयच्या कार्यालयात नेले. ही चौकशी सुरू असताना जितेशने बाथरूममध्ये जाऊन काचेच्या तुकड्याने आपला गळा चिरण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी त्याला तत्काळ रोखले. या घटनेत त्याच्या गळ्याला गंभीर जखम झाली असून त्यांना सिडकोतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणीदेखील पोलिस पहारा देत आहेत.
हिनहोरिया दरमहा ५ ते १० किलो ड्रग्जची परराज्यात तस्करी करत होता. सुमारे दोन वर्षांपासून त्याचा हा उद्योग सुरू होता. हिनहोरिया ड्रग्जचा ‘होलसेल’ पुरवठादार आहे. तो ड्रग्जचा पुरवठा पाच-पाच किलोच्या पाकिटातून करत होता. छत्रपती संभाजीनगरात तयार केलेले ‘एमडी ड्रग्ज’ तो मुंबई, गुजरात व मध्य प्रदेशात पाठवत होता. कोकेनचा कच्चा माल दक्षिण अमेरिकेतून येत होता. त्यावर संभाजीनगरात प्रक्रिया केली जात होती. नंतर हे कोकेन मुंबई, दिल्लीसह अमेरिकेत तस्करी केले जात होते. केटामाइन युरोप व अमेरिकेतून कच्च्या स्वरूपात येत होते. त्यावर प्रक्रिया करून पुन्हा युरोप, अमेरिकेत पाठवले जात होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App