वृत्तसंस्था
राजकोट : गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील अटकोट येथे निर्भया प्रकरणासारखी घटना समोर आली आहे. आरोपीने सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. अयशस्वी झाल्यावर त्याने मुलीच्या गुप्तांगात रॉड टाकला. मुलीला राजकोट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Gujarat Minor Rape
पोलिसांनी आरोपीची ओळख पटवण्यासाठी सुमारे 100 संशयितांची चौकशी केली. त्यानंतर रामसिंग तेरसिंगची ओळख पटवून त्याला अटक केली. आरोपी मध्य प्रदेशातील अलीराजपूरचा रहिवासी आहे.
तोंड दाबून बलात्कार करण्याचा प्रयत्न
दाहोद जिल्ह्यातील एक मजूर कुटुंब अटकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाजवळ शेतात मजुरी करत होते. 4 डिसेंबर रोजी जेव्हा कुटुंब शेतात काम करत होते, तेव्हा त्यांची सहा वर्षे, आठ महिन्यांची मुलगी तिथे खेळत होती. याच दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने त्या मुलीला उचलून नेले आणि तिच्यावर अत्याचार केले.
आरोपीने मुलीचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मुलगी ओरडली, तेव्हा त्याने मुलीच्या गुप्तांगात रॉडसारखे धारदार शस्त्र टाकले. घटनेनंतर आरोपी रक्तबंबाळ मुलीला तिथेच सोडून पळून गेला.
जेव्हा कुटुंबीयांनी मुलीचा शोध सुरू केला, तेव्हा ती जवळच रक्ताने माखलेली आढळली. मुलीची गंभीर अवस्था पाहून कुटुंबीयांनी तिला तत्काळ राजकोट येथील रुग्णालयात नेले. मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत.
10 पथके तयार करून 100 संशयितांची चौकशी
राजकोट ग्रामीण एसपी विजयसिंह गुर्जर यांनी सांगितले की, पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर 10 पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. सुमारे 100 संशयितांची चौकशी करण्यात आली.
त्यानंतर, बालरोग तज्ज्ञासह सुमारे 10 आरोपींना मुलीसमोर हजर करण्यात आले, जिथे मुलीने मुख्य आरोपी 30 वर्षीय रामसिंग तेरसिंग याची ओळख पटवली, त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी गुजरातच्या अटकोटमध्ये गवंडी काम करतो. त्याला एक मुलगी आणि दोन मुलगे आहेत. आरोपीला घटनेच्या ठिकाणाजवळील शेतातून पकडण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App