मध्य प्रदेश पाठोपाठ गुजरातमध्येही कुंभमेळ्यातून येणाऱ्या भाविकांना कोरोना चाचणी बंधनकारक

मध्य प्रदेशपाठोपाठ आता गुजरातनेही कुंभमेळ्यातून येणाऱ्या भाविकांसाठी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांना आपल्या घरी जाऊ दिले जाणार नाही. Gujarat, followed by Madhya Pradesh, Corona test mandatory for Kumbh Mela devotees


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : मध्य प्रदेशपाठोपाठ आता गुजरातनेही कुंभमेळ्यातून येणाऱ्या भाविकांसाठी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांना आपल्या घरी जाऊ दिले जाणार नाही.

हरिद्वार येथील महाकुंभमेळ्याला लाखोच्या संख्येनं साधू-संत आणि भाविक उपस्थित राहिले. शाही स्नानासाठीदेखील एकच गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यानंतर अनेक संतांसह भाविकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली.

या पार्श्वभूमीवर कोरानाचा अगोदरच कहर असलेल्या गुजरातमध्ये हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सांगितले की कुंभमेळ्यातून आलेला कोणताही भाविक कोरोना चाचणी केल्याशिवाय आपल्या गावात जाऊ शकणार नाही.

गुजरातमधील सर्व जिल्हाधिकाºयांना आदेश देण्यात आले आहेत की त्यांनी आपल्या भागातील कुंभमेळ्याहून आलेल्या भाविकांची तपासणी करावी. त्यासाठी नाकाबंदी करावी. कोणालाही चाचणी केल्याशिवाय आपल्या घरी जाऊ देऊ नये.

यौपकी कोरोनाबाधित आलेल्या भाविकांना १४ दिवस आयसोलेशनमध्ये ठेवले जाईल. त्यासाठी सरकारकडून व्यवस्था करण्यात येणार आहे.
यापूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही उत्तराखंड येथील हरिद्वार येथे साजरा होत असलेल्या कुंभमेळ्यातील भाविकांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. आतापर्यंत कुंभमेळ्यातून परतल्यांपैकी १७०१ भाविकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हरिद्वार येथील तपासणी केंद्रावरच हे बाधित असल्याचे दिसून आले आहे.



पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी जी यांच्यासोबत आज फोनवर बोलणं झालं. सर्व संतांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला प्रत्येक प्रकारचे सहकार्य करत आहेत. यासाठी मी संतांचे आभार व्यक्त केले. मी विनंती केली, की दोन शाही स्नान झाले आहेत आणि इथून पुढे कोरोनाचे संकट पाहाता कुंभ प्रतिकात्मकच ठेवले जावे. यामुळे या संकटाविरोधातील लढाईला एक ताकद मिळेल.

कोरोनाचा वाढता प्रसार आणि हरिद्वार कुंभमध्ये दररोज आढळणारे कोरोना रुग्ण पाहाता कुंभ समाप्तीची चर्चा सुरू होती. याच चर्चेदरम्यान गुरुवारी निरंजनी आखाड्याने समाप्तीची घोषणा केली होती. आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी कुंभच्या समाप्तीची घोषणा करत सांगितले, की कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता आखाड्याने असा निर्णय घेतला आहे, की 17 एप्रिलला कुंभ मेळा समाप्त केला जाईल. पुरी यांनी इतर आखाड्यांनाही मेळा समाप्त करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांच्या या निर्णयाला काही आखाड्यांनी प्रचंड विरोधही दर्शवला. निरंजनी आखाड्याला अशा प्रकारची घोषणा करण्याचा अधिकारच नाही, असे इतर आखाड्यांमधील साधूंनी म्हटले आहे.

Gujarat, followed by Madhya Pradesh, Corona test mandatory for Kumbh Mela devotees

 

महत्वाच्या बातम्या वाचा

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात