वृत्तसंस्था
नवी दिल्ली : गेल्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात जीएसटी संकलनात घट झाली आहे. ऑगस्टमध्ये 1.44 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन करण्यात आले. जे जुलैमध्ये 1.49 लाख कोटी जीएसटी संकलन होते. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात जुलैच्या तुलनेत कम संकलन झाले.GST Collection 28% increase in tax collection in August compared to last year; Maharashtra tops, collections of 1.44 lakh crores
तथापि, वर्ष-दर-वर्ष (YOY) आधारावर यात 28 टक्के वाढ दिसून आली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये, जीएसटी संकलन 1.12 लाख कोटी रुपये होते. आतापर्यंतचे सर्वात मोठे जीएसटी संकलन एप्रिल महिन्यात झाले. तेव्हा 1.67 लाख कोटींचे जीएसटी संकलन झालेले होते.
ऑगस्टमध्ये CGST रु. 24,710 कोटी, SGST रु. 30,951 कोटी, IGST रु. 77,782 कोटी आणि उपकर रु. 10,168 होता. यापूर्वी जुलैमध्ये CGST 25,751 कोटी रुपये, SGST 32,807 कोटी रुपये, IGST 79,518 कोटी रुपये आणि उपकर 10,920 रुपये होता.
एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाचा विक्रम
एप्रिल-2022 मध्ये पहिल्यांदाच GST संकलन 1.5 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. एप्रिलमध्ये एकूण GST महसूल 1,67,540 कोटी रुपये नोंदवला गेला. यामध्ये सीजीएसटी 33,149 कोटी रुपये, एसजीएसटी 41,793 कोटी रुपये, आयजीएसटी 81,939 कोटी रुपये आणि सेस 10,649 कोटी रुपये होता.
जीएसटी संकलनात ही राज्य आघाडीवर
जून-2022 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या 5 राज्यांमध्ये आघाडीवर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलन 17 टक्क्याने वाढून 22,129 कोटी रुपये झाले आहे. या यादीत 9,795 कोटींच्या संकलनासह कर्नाटक दुसऱ्या तर गुजरात 9,183 कोटींच्या संकलनासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App