विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – विदेशांमध्ये संपत्ती दडवून ठेवल्यांची नावे उघड करणाऱ्या ‘पँडोरा पेपर्स’मध्ये सुमारे तीनशे भारतीयांची नावे आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून कायद्यानुसार योग्य कारवाई केली जाईल, असे अर्थमंत्रालयाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.Govt. will enquire Pandora papers
जगभरातील अनेक नेते गेल्या अनेक वर्षांपासून करसवलत असलेल्या देशांमध्ये संपत्ती लपवून ठेवत आहेत, असा खळबळजनक दावा ‘पँडोरा पेपर्स’ या जगभरातील पत्रकारांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय गटाने केला आहे.
‘सरकारने या प्रकरणाची दखल घेतली आहे. तपास संस्थांच्या मार्फत तपास करून योग्य कारवाई केली जाईल. तपास वेगाने आणि प्रभावीपणे होण्यासाठी इतर देशांमधील तपास संस्थांशीही संपर्क साधला जाईल,’ असे निवेदनात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App