विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालातून धडा घेत प्रत्यक्ष रोजगार निर्मिती शेती क्षेत्र गरीब आणि महिला यांच्यावर भर देणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मांडला. Govt to provide financial support for loans up to Rs 10 lakhs for higher education in domestic institutions
आधीच्या अर्थसंकल्पांमध्ये रोजगार किंवा शेती या विषयांवर भर असायचाच, पण प्रामुख्याने पायाभूत सुविधांवर मोठ मोठ्या तरतुदींचा भरमारा असायचा. त्याऐवजी आता युवकांसाठी प्रत्यक्ष रोजगार निर्मिती, शिक्षण क्षेत्रातील तरतुदी तसेच शेती विषयक तरतुदी गरीब आणि महिलांविषयी तरतुदी यावर 2024 – 25 च्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने भर दिल्याचे स्पष्ट झाले आहे. रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतूद, तसेच तरुणांसाठी 5 नव्या योजनांची घोषण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.
रस्ते मार्गाच्या विकासासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातील. त्यासाठी तब्बल 26 हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.
Budget 2024 | On Education loans, FM Sitharaman says,"Govt to provide financial support for loans up to Rs 10 lakhs for higher education in domestic institutions." pic.twitter.com/nH3daipqEW — ANI (@ANI) July 23, 2024
Budget 2024 | On Education loans, FM Sitharaman says,"Govt to provide financial support for loans up to Rs 10 lakhs for higher education in domestic institutions." pic.twitter.com/nH3daipqEW
— ANI (@ANI) July 23, 2024
रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतूद
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ उत्कृष्ट आहे. भारताची चलनवाढ स्थिर राहून 4 टक्क्यांच्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. गरीब, तरुण, महिला, शेतकरी अशा महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रोजगार, कौशल्य, एमएसएमई, मध्यमवर्गावर सतत लक्ष केंद्रीत केलं जात आहे. ते म्हणाले की, रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटी रुपयांचे बजेट आहे.
तरुणांसाठी 5 नव्या योजनांची घोषणा
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 2 लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय खर्चासह 5 वर्षांतील 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी 5 योजना आणि उपक्रमांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर करताना मला आनंद होत आहे. यावर्षी आम्ही शिक्षण, रोजगार आणि कौशल्यांसाठी 1.48 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की, “अंतरिम अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे, आम्हाला 4 विविध जाती, गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यावर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी, आम्ही सर्व प्रमुखांसाठी उच्च किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. पीएम गरीब कल्याण अन्न योजना 5 वर्षांसाठी वाढवली आहे, त्यामुळे 80 कोटींहून अधिक लोकांना लाभ झाला आहे.
केंद्र सरकारकडून २० लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. कोणत्याही योजनेसाठी पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांचे कर्ज देण्यात येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App