पंजाब मध्ये आम आदमी पार्टी सरकारकडून राज्यपालांचा अपमान; सरकारी हेलिकॉप्टर नाही वापरणार, बनवारीलाल पुरोहितांचे कडक प्रत्युत्तर

वृत्तसंस्था

चंदीगड : केंद्रातील भाजप सरकार विरुद्ध भाजपेतर राज्यांचा द्वेष एवढा वाढला आहे की, केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राज्यपालांचा अपमान करण्याची संधी पश्चिम बंगाल आणि पंजाब या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सोडलेली नाही. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना राज्य सरकारने हेलिकॉप्टर दिले म्हणून ते बॉर्डरवर जाऊ शकले, असा आरोप आम आदमी पार्टी सरकारने केला त्याला बनवारीलाल पुरोहित यांनी कडक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. Governor insulted by Aam Aadmi Party government in Punjab

मी काही खासगी कामासाठी बॉर्डर वर गेलो नाही. सरकारी कामासाठीच तिथे गेलो होतो आणि राज्यपाल म्हणून तो माझा अधिकार आहे. मला हेलिकॉप्टर देणे हे तुमचे सरकार म्हणून कर्तव्य आहे. आत्तापर्यंत राज्यपाल पदावरून मी नेहमीच विमानात इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास केला आहे. चार-पाच वेळात फक्त सरकारी हेलिकॉप्टरचा वापर केला. त्यावेळी देखील मी एकटा हेलिकॉप्टर मधून गेला नाही तेव्हा पंजाबचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक माझ्याबरोबर होते, असे उद्गार राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी काढले.

त्याचवेळी त्यांनी, पण मी आत्तापासून असे जाहीर करतो की मी पंजाबचा राज्यपाल असेपर्यंत तुमचे सरकारी हेलिकॉप्टर वापरणार नाही. ते तुमचे तुम्हालाच लखलाभ होवो, अशा कठोर शब्दांमध्ये राज्यपालांनी बनवारीलाल आम आदमी पार्टी सरकारचा समाचार घेतला.

पश्चिम बंगाल आणि पंजाब मध्ये राज्यपालांचा अपमान करण्याची आणि त्यांच्या सरकारी कामातही अडथळा आणण्याची आणण्याचा तिथल्या सरकारांनी पायंडाच पाडला आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सध्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड तिथे राज्यपाल असताना त्यांच्याशी असहकार पुकारला होता. आता पंजाब मध्ये आम आदमी पार्टीच्या मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारने राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याशी सहकार पुकारला आहे. त्यातूनच राज्यपालांना सरकारने हेलिकॉप्टर दिले, असा आढ्यताखोर दावा केला.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना हेलिपॅड वर हेलिकॉप्टर मधून उतरवले होते. पंजाब मध्ये देखील त्याची वेगळ्या प्रकारे पुनरावृत्ती झाली. त्यामुळेच राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी कडक शब्दांत तिथल्या सरकारला प्रत्युत्तर दिले.

Governor insulted by Aam Aadmi Party government in Punjab

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात