वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकार टोल प्लाझा बदलण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा विचार करत आहे. नवीन प्रणाली सहा महिन्यांत सादर केली जाईल, अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली.Government’s plan to change toll plazas, will bring satellite based tolls to reduce queues, Gadkari’s information
प्रश्नोत्तराच्या सत्रात त्यांनी हे स्पष्ट केले. या प्रणालीसाठी दोन पर्यायांची तयारी केली जात आहे. उपग्रहाधारित टोल प्रणालीत कारमध्ये जीपीएस असेल व टोल थेट प्रवाशाच्या बँक खात्यातून कापून घेतला जाईल. दुसरा पर्याय नंबर प्लेटचा आहे. उपग्रहाचा वापर करून आम्ही फास्टॅगऐवजी जीपीएस लावण्याच्या विचारात आहोत. टोल घेतला जाऊ शकतो.
गडकरी म्हणाले- मी टोल टॅक्सचा जनक
केंद्रीय मंत्री म्हणाले, मी देशातील एक्स्प्रेस-वेवरील टोल टॅक्सचा जनक आहे. कारण 1990च्या दशकाच्या अखेरीस राज्य मंत्री म्हणून महाराष्ट्रात अशा प्रकारचा पहिला मार्ग तयार केला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App