विशेष प्रतिनिधी
मुबंई : आर्यन खान याची अटक आणि क्रूझ ड्रग प्रकारनाने अचानकच वेगळे वळण घेतले आहे. जेव्हा एनसीबीचे पंच असलेले प्रभाकर साईंनी प्रसार माध्यमांसमोर येऊन अनेक खुलासे केले. प्रभाकर साहिल हे के.पी.गोसावींचे सुरक्षारक्षक आहेत. केपी गोसावी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. प्रभाकर साईल यांनी यावेळी काही व्हिडिओ आणि फोटो पुरावे म्हणून दाखवले होते. ज्यामध्ये केपी गोसावी आर्यन खानच्या शेजारी बसलेले दिसून येत आहेत. आणि फोनवरून आर्यन खान कोणासोबतही बोलत आहे असे दिसून येतेय. आर्यन खानच्या सुटकेबद्दल 25 कोटींची डील करण्यासाठी संभाषण चालले होते असेदेखील प्रभाकर साईल यांनी यावेळी एबीपी माझा सोबत बोलताना सांगितले आहे.
Gosavi’s explanation about ‘that’ photo: Aryan Khan asked me to call Shah Rukh Khan
या प्रकरणानंतर इंडीया टुडेशी फोनवर बोलताना केपी गोसावी यांनी आपली बाजू मांडताना म्हटले, आर्यनने मला त्यांच्या मॅनेजरसोबत बोलण्याची इच्छा प्रकट केली होती. त्यावेळी त्याच्याकडे स्वत:चा फोन नव्हता. म्हणून मी माझ्या फोनवरून त्याला त्याच्या पालकांसोबत आणि मॅनेजर बोलण्यासाठी फोन कनेक्ट करून दिला होता. असे स्पष्टीकरण गोसावी यांनी यावेळी दिले आहे.
केपी गोसावीचं लोकेशन वारंवार बदलतय ; नेमकं लोकेशन काय आहे ? पुणे पोलिसांचे दोन पथक परराज्यात जाऊन घेणार शोध
प्रभाकर साईल यांनी एबीपी माझा सोबत बोलताना असे देखील सांगितले होते की, हा फोननंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी, सॅम नावाचा एक व्यक्ती आणि किरण गोसावी यांची 15 मिनिटांसाठी भेट झाली होती. आणि 25 कोटींची डील फायनल करण्याच्या बाबत चर्चा झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App