ही वाढ सातव्या वेतन आयोगाअंतर्गत करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Government Employees केंद्रीय मंत्रिमंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. या वाढीमुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळेल. या निर्णयामुळे, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांचा महागाई मदत (DR) 53टक्केवरून ५५ टक्क्यांपर्यंत वाढेल.Government Employees
ही वाढ सातव्या वेतन आयोगाअंतर्गत करण्यात आली आहे. यापूर्वी, शेवटची वाढ जुलै २०२४ मध्ये झाली होती, जेव्हा महागाई भत्ता ५०टक्केवरून ५३ टक्के करण्यात आला होता. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार १८,००० रुपये असेल, तर त्याला आता दरमहा ३६० रुपये जास्त मिळतील (१८,००० रुपयांच्या २ टक्के), म्हणजेच त्याला वार्षिक ४,३२० रुपये लाभ मिळेल.
अहवालानुसार, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा वाढीव पगार मिळेल आणि जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांचा थकबाकीही मिळेल. सरकारी कर्मचाऱ्यांना डीए मिळतो, तर पेन्शनधारकांना डीआर मिळतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App