Good news : चाकरमान्यांसाठी खुशखबर; पीएफवर मिळणार तब्बल 8.25 टक्के व्याजदर, 7 कोटी कर्मचाऱ्यांना लाभ

Good news

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Good news कर्मचारी भविष्य निधी संगठनने (ईपीएफओ) २०२४-२५ वित्त वर्षात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर जैसे थे ठेवले आहेत. अर्थात गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीही देशातील ७ कोटी कर्मचाऱ्यांना ८.२५% व्याज दिले जाणार आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये ईपीएफओने व्याज दर ८.१५% वरून ८.२५% केला होता. यापूर्वी मार्च २०२२ मध्ये व्याजदरात कपात करून ८.५% वरून ८.१% करण्यात आला होता. गेल्या चार दशकातील हा सर्वात कमी व्याज दर होता.Good news

यंदा व्याजदरात कपात होण्याची भीती व्यक्त केली जात होती. पंरतु शुक्रवारी केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत व्याज दर ८.२५% कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ईपीएफमध्ये जमा झालेल्या निधीवरील व्याज दराच्या मंजुरी मिळण्यासाठी ते अर्थमंत्रालयाकडे पाठवले जाईल. सरकारची मंजुरी मिळताच ईपीएफओच्या ७ कोटी ग्राहकांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होईल.



फायद्याचा सौदा : सर्वाधिक व्याजदर सध्या पीएफवरच

ईपीएफवर सध्या मिळणारा ८.२५% व्याजदर इतर बचत योजनांपेक्षा सर्वाधिक. सुकन्या समृद्धी योजना 8.2% ज्येष्ठ नागरिक बचत योजना 8.2% राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) 7.7% किसान विकास पत्र 7.5% पोस्ट ऑफिस ठेव (५ वर्षे) 7.5% पीपीएफ 7.1% तीन वर्षांची मुदत ठेव 7.1% पोस्ट ऑफिस बचत 4%

Good news for employees; 8.25 percent interest rate on PF, 7 crore employees will benefit

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात