प्रतिनिधी
नवी दिल्ली : महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांसह चांगल्या पाऊसमानासाठी आसुसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हवामान खात्याने (IMD) मंगळवारी यंदाच्या पाऊसमानाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार, यंदा देशात 96 टक्क्यांपर्यंत पाऊसमान होईल.Good news 96 percent of rain forecast this year, no El Nino influence; Information from Meteorological Department
96 टक्के होणार पाऊसमान!
या वर्षी देशात मान्सून सरासरी राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण पावसाळ्यात 96% पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी पावसाचा अंदाज वर्तवत ही माहिती दिली. महापात्रा म्हणाले, दक्षिण-पश्चिम मान्सूनदरम्यान देशभरात जून ते सप्टेंबरपर्यंत 96% पाऊस होऊ शकतो. यामध्ये 5% कमी किंवा अधिक असू शकतो. ते म्हणाले, 1971-2020 मधील आकडेवारी पाहता देशात दीर्घ कालावधीचा सरासरी पाऊस 87 सेंटिमीटर आहे. तथापि, याच्या एक दिवस आधीच खासगी हवामान संस्था स्कायमेटने यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. कारण मान्सूनवर अल नीनोचा धोका आहे.
अल नीनोचा परिणाम होण्याची शक्यता
हवामान विभागानुसार, विषुववृत्तीय प्रशांत क्षेत्रात ला नीना तटस्थ आहे. ताज्या हवामान मॉडेल अंदाजानुसार अल नीनोची स्थिती पावसाळ्यादरम्यान विकसित होण्याची शक्यता आहे. अल नीनोचा प्रभाव मान्सूनच्या दुसऱ्या भागात जाणवू शकतो. महापात्रा म्हणाले, सर्व अल नीनो वर्षे खराब मान्सुनी वर्षे नसतात. 1951 ते 2022 दरम्यान 40 टक्के अल नीनो वर्षे सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक मान्सुनी पावसाचे राहिली आहेत.
‘ला निना’ व ‘एल निनो’ म्हणजे काय?
ला निनामध्ये समुद्राचे पाणी वेगाने थंड होते. ला निनाचा जगभरातील हवामानावर परिणाम होतो. हवामान तज्ज्ञांच्या मते, यामुळे आकाशात ढग येऊन पाऊस पडतो. भारतातील कमी-अधिक प्रमाणात पडणारा पाऊस, थंडी व उन्हाळा ला निनावरच अवलंबून असतो. भारतात ‘ला निना’मुळे थंडी व पावसाची शक्यता असते.
ला निनासारखाच अल निनोचाही जगभरातील हवामानावर प्रभाव पडतो. त्यात समुद्राचे तापमान 3 ते 4 अंशांनी वाढते. त्याचा परिणाम 10 वर्षांत दोनदा होतो. याच्या प्रभावामुळे जास्त पावसाच्या भागात कमी, तर कमी पावसाच्या भागात जास्त पाऊस पडतो. ‘अल निनो’मुळे भारतात अनेकदा मान्सून कमकुवत होतो. यामुळे दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण होते.
गतवर्षी महाराष्ट्रात सरासरीच्या 119 टक्के पाऊस
गेल्या वर्षी राज्यात मान्सूनचे आगमन 10 जून 2022 रोजी झाले. 2022च्या मान्सून हंगामात सरासरीच्या 119.8% पाऊस पडला. राज्यात सरासरीच्या तुलनेत जूनमध्ये 71.4%, जुलै-146.0 %, ऑगस्ट- 91.0 %, सप्टेंबर-141.6 % तर ऑक्टोबरमध्ये 199.2 % पाऊस पडला. 2021-22 मध्ये सरासरीच्या 118.2 % पाऊस पडला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App