जाणून घ्या, कोण आहेत ते माजी खासदार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Goldie Brar गुरुग्राम, हरियाणा येथील माजी खासदार आणि आघाडीच्या रिअल इस्टेट फर्मच्या संस्थापकास कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रारच्या नावाने धमक्या मिळाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. भाजपचे माजी खासदार सुखबीर सिंग जौनपुरिया हे रिअल इस्टेट डेव्हलपर एसएस ग्रुपचे संस्थापक देखील आहेत. त्यांच्याकडे दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) मध्ये सर्वात मोठ्या लँड बँक आहेत.Goldie Brar
सूत्रांनी सांगितले की, अज्ञात फोन करणाऱ्याने सुखबीर सिंग यांचा मुलगा अशोक जौनापुरिया याला गोल्डी ब्रारच्या नावाने फोन केला आणि प्रोटेक्शन मनी म्हणून ५ कोटी रुपयांची मागणी केली. फोन करणाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिली आणि संपूर्ण कुटुंबाला लक्ष्य करण्याचा इशारा दिला.
अशोक जौनपुरिया कोण आहेत?
अशोक जौनापुरिया हे एसएस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. फोन करणारा खरोखर गोल्डी ब्रार होता की आणखी कोणी याचा तपास पोलीस करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सतींदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार हा पंजाबी गायक सिद्धू मूस वालाच्या हत्येमागील कथित सूत्रधार आहे. एसएस ग्रुपने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे की गुरुग्राम परिसरात त्यांची मोठी उपस्थिती आहे. गुरुग्राममध्ये यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या त्यांच्या काही उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये द हिबिस्कस, एसएस द लीफ, एसएस प्लाझा आणि एसएस ओम्निया यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App