अभिनेत्रीचा रान्या राव हिन आरोप केला की, पोलिसांनी त्यांना १०-१५ वेळा मारहाण केली
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : Actress Ranya Raos सोने तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी कन्नड अभिनेत्री रान्या रावच्या वडिलांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. कर्नाटक राज्य पोलिस गृहनिर्माण महामंडळाचे डीजीपी रामचंद्र राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. भरती विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के.व्ही. शरत चंद्रा यांना कर्नाटक राज्य पोलिस गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड, बंगळुरूचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा समवर्ती कार्यभार तत्काळ देण्यात आला आहे.Actress Ranya Raos
कन्नड अभिनेत्री आणि रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी रान्या राव ही सोने तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. शुक्रवारी आर्थिक गुन्हे न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिने शनिवारी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
रान्या राव हिने आरोप केला की महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी तिला मारहाण केली आणि काही रिकाम्या आणि आधीच लिहिलेल्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. ६ मार्च रोजी बंगळुरू येथील डीआरआयच्या अतिरिक्त महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात रान्या हिने दावा केला की तिच्यावर खोटा खटला लादण्यात आला आहे. तिने पत्रात म्हटले आहे की दुबईहून परतल्यावर तिच्यावर १४ किलोपेक्षा जास्त सोने बाळगल्याचा खोटा आरोप करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App