परदेशात जाऊन भारतावर टीका केल्याने राहुल गांधींची विश्वासार्हता नाही वाढणार; जयशंकर यांचा खोचक टोला

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात मोदी सरकार 9 वर्षे पूर्ण करत असताना राहुल गांधी अमेरिकेत आहेत. तिथे त्यांनी भारतात लोकशाही नसल्याची भाषणे केली आहेत. या मुद्द्यावरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधींना खोचक शब्द टोला हाणला आहे. मला नाही वाटत की परदेशात जाऊन भारतावर टीका केल्याने राहुल गांधींचे विश्वासार्हता वाढेल, अशा शब्दांमध्ये जयशंकर यांनी राहुल गांधींचे वाभाडे काढले आहेत. Going abroad and criticizing India will not increase Rahul Gandhi’s credibility

मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशाच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. राहुल गांधींवर संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जयशंकर म्हणाले, की राहुल गांधींची आता ही सवयच झाली आहे की परदेशात जाऊन भारतात वर टीका करायची. भारतातल्या राजकारणावर टीका टिपण्णी करून भारतात लोकशाही नसल्याचे भासवत राहायचे. पण संपूर्ण जग बघते आहे की भारतात लोकशाही आहे. कारण भारतात नेहमी निवडणुका होतात आणि या निवडणुकांमध्ये कधी एक पक्ष जिंकतो तर कधी दुसरा जिंकतो. जर भारतात लोकशाही नसती तर प्रत्येक निवडणुकीत एकच पक्ष जिंकायला हवा होता. पण प्रत्यक्षात तसे घडत नाही, हे जग बघते आहे.’

पण राहुल गांधींना भारतात लोकशाही नसल्याचा नॅरेटिव्ह चालवायचा आहे. तो नॅरेटिव्ह भारतात कमी चालला की ते परदेशात जाऊन भारतावर टीका करतात. त्यांना असे वाटते की परदेशात जाऊन भारतावर टीका केली तर त्यांना भारतात वाढता पाठिंबा मिळेल. पण प्रत्यक्षात तसे घडत नाही. मला अजिबात असे वाटत नाही, की परदेशात जाऊन राहुल गांधींनी भारतावर टीका केली तर भारतात त्यांची विश्वासार्हता वाढून त्यांना कुठला राजकीय फायदा होईल, अशा खोचक शब्दांमध्ये राहुल गांधींच्या भाषणांचा जयशंकर यांनी समाचार घेतला.

त्याचवेळी जयशंकर यांनी 2024 च्या निवडणुकीचा निकाल काय असेल हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, असेही अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना सुनावले.

Going abroad and criticizing India will not increase Rahul Gandhi’s credibility

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात