वृत्तसंस्था
नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन वाढविण्यावर केंद्रातले मोदी सरकार भर देत असून येत्या आठवडाभरात त्याच्या किमतीही कमी करण्यात येतील, असे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी आज सांगितले. Goal has decided to increase production supply & reduce prices of Remdesivir drug
देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली आहे. हे लक्षात घेऊन त्याचे उत्पादन महिन्याला ८० लाख व्हायरल्स करण्याचे तसेच त्याचा पुरवठा त्याच्या अनुसार करण्याचे निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे मांडविया यांनी सांगितले.
WATCH | रेमडेसीवीरचा वापर योग्य की अयोग्य? पाहा WHO चे मत
तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमतीही प्रत्येक डोसला ३५०० रूपयांपर्यंत खाली आणण्यास उत्पादकांनी मान्यता दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये कोरोना फैलावत असताना ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतो आहे. त्यावर लवकरात लवकर उत्पादन वाढ करून त्याचे वितरण गरजेनुसार जलदीने करण्याच्या उपाययोजना केंद्र सरकार करीत आहे, असे मनसुख मांडविया यांनी स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App