Goa Exit Poll : गोव्यात काँटे की टक्कर; पण 18 ते 22 जागा जिंकून सत्तेवर येण्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचा दावा

वृत्तसंस्था

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीतील एक्झिट पोल नुसार सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यात विविध वृत्तवाहिन्यांनी “काँटे की टक्कर” दाखवली असून भाजपला 14 ते 16 आणि काँग्रेसला 15 ते 17 जागा मिळत असल्याचे दाखविले आहे. प्रामुख्याने टीव्ही नाईन भारतवर्ष, झी न्यूज, आज तक या वृत्तवाहिन्यांनी गोव्यात “काँटे की टक्कर” असल्याचे म्हटले आहे. Goa Exit Poll 18 to 22 win in election

या वृत्तवाहिन्यांच्या अंदाजावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड मणिपूर या चारही राज्यांमध्ये भाजपची लाट असून गोव्यात भाजपला 18 ते 22 जागा मिळतील आणि पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार बनेल, असा दावा डॉ. सावंत यांनी केला आहे, इतकेच नाही तर गोव्यातली अर्धवट राहिलेली पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी जनतेने भाजपला कौल दिला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

– काँटे की टक्कर नेहमीचीच!!

गोव्यात आत्तापर्यंत कायमच भाजप आणि काँग्रेस यांच्यात “काँटे की टक्कर” राहिली आहे. गेल्या वेळेला काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठता आला नसला तरी 17 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. परंतु, पी चिदंबरम यांना काँग्रेससाठी बहुमताचा 21 चा आकडा पूर्ण करता आला नाही आणि भाजपने विशेषतः केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आकड्यांचे गणित जुळवून गोव्यात सत्ता आणून दाखवली होती.

– उत्पल पर्रीकरांची बंडखोरी

त्यावेळी मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री बनले होते. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्री आले. निवडणुकीच्या काळात मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांनी भाजप कडे तिकीट मागितले होते परंतु त्यांना पक्षाने तिकीट दिले नाही. ते अपक्ष म्हणून निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. उपमुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना देखील पक्षाने तिकीट नाकारले आहे. त्यामुळे गोव्यात काही मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध भाजप अशी लढत असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 18 ते 20 जागा मिळवून गोव्यात भाजपा सत्ता टिकवेल, असा दावा केला आहे.

10 मार्च रोजी प्रत्यक्ष निकालात नेमका कोणाचा दावा पक्का होतो हे ठरणार आहे.

Goa Exit Poll 18 to 22 win in election

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात