विशेष प्रतिनिधी
पणजी : गोव्यात उत्पल पर्रीकर यांचे बंड भाजप लाभले असून सुरुवातीच्या फळांमध्ये भाजप 18 जागांवर तर काँग्रेस 16 जागांवर आघाडीवर आहे तृणमूल काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेनेचा इथे सुपडा साफ होताना दिसतो आहे. अर्थातच गोव्यातली निवडणूक घासून होत असून सत्तास्पर्धा आता वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये तीव्र होत चालली आहे. 21 ची मॅजिक फिगर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी असाध्य असल्याचे स्पष्ट होत आहे. उत्पल पर्रीकरांच्या बंडामुळे निवडणुकीत चुरस वाढून त्याचा फटका भाजपला बसल्याचे दिसत आहे. Goa Election Results 2022: Utpal Parrikar’s revolt in Goa engulfs BJP; It is difficult for Congress to reach 20 !! The power struggle is over !!
गोव्यात 40 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. येथे भाजप 18, काँग्रेस 16 आणि टीएमसी 3 जागांवर आघाडीवर आहेत. सत्तेसाठी २१ जागा आवश्यक असून येथे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष ही गोव्याची सर्वात जुनी प्रादेशिक शक्ती, किंगमेकर म्हणून पुन्हा उदयास आली आहे.
#GoaElections2022 | BJP leading in 17 seats, Congress- 13, Maharashtrawadi Gomantak-5, Aam Aadmi Party-1, as per early EC trends pic.twitter.com/sZmhh8r9an — ANI (@ANI) March 10, 2022
#GoaElections2022 | BJP leading in 17 seats, Congress- 13, Maharashtrawadi Gomantak-5, Aam Aadmi Party-1, as per early EC trends pic.twitter.com/sZmhh8r9an
— ANI (@ANI) March 10, 2022
गोव्यात झालेल्या मतमोजणीत शिवसेना कुठेही दिसत नाही. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा प्रभाव येथे फ्लॉप शो झाल्याच्या चर्चा सगळीकडे होत आहे.
माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांच्याविरोधात निवडणूक लढणारे भाजपचे बाबूश मोन्सेरात पणजी मतदारसंघातून 383 मतांनी आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे त्यांची पत्नी ताळगाव येथून जेनिफर बाबूश मोन्सेरात यादेखील आघाडीवर आहेत.
मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात वाळपई मधून विश्वजित राणे हे 1300 मताने तर पर्यायांमधून दिव्या राणे या 2600 मतांनी आघाडीवर आहेत.
गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत (भाजप), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (काँग्रेस), माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ (टीएमसी), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष) यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे.
त्याचवेळी, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री उमेदवार अमित पालेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App