भारतातील कट्टर मुसलमान देशाची नोकरशाही स्वत:च्या नियंत्रणात घेण्यासाठी ‘यूपीएससी’ जिहाद’ म्हणजेच ‘नोकरशाही जिहाद’ चालवत आहेत. ‘यूपीएससी’त परिक्षेत ‘जकात फाउंडेशन’चे मुसलमान विद्यार्थी भारतातून मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण होत आहेत. यासाठी त्यांना आतंकवादी संघटनांकडून अर्थपुरवठा होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. Global conspiracy to convert India to ‘Ghazwa-e-Hind’, Muslim, claim on the platform of Hindu Janajagruti Samiti.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ‘जकात फाउंडेशन’च्या ‘शरीयत परिषदे’चा वरिष्ठ सल्लागार मौलाना कलीम सिद्दीकी याला धर्मांतरासह आर्थिक हेराफेरीच्या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी नुकतीच अटक केली. सिद्दीकी हा फक्त एक प्यादा असून यामागे भारतात ‘गझवा-ए-हिंद’ करण्यासाठी हिंदूंच्या धर्मांतरणाचे जागतिक षडयंत्र चालू आहे, असा दावा हिंदू जनजागृतीच्या व्यासपीठावरुन करण्यात आला.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘भारतात धर्मांतर जिहाद !’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद झाला. यात ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके, प्रयागराग टाइम्सचे संपादक अनुपम मिश्रा, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर प्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक विश्वनाथ कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.
चव्हाणके म्हणाले की, सरकारने या प्रकरणात काही जणांना जरी अटक केली असली, तरी हा ‘जिहाद’ अनेक मौलाना राबवत आहेत आणि अजूनही ते मोकाट फिरत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा विकलांग व्यक्ती, दूरवस्तीत राहणारे हिंदू यांना प्रथम लक्ष्य करून त्यांना धर्मांतरीत केले जात आहे. गेल्या 15 महिन्यांत केवळ बिहारमध्येच 10 लाख हिंदूंचे धर्मांतर झाले असून ते आता ख्रिस्ती बनले आहेत. भारतात अन्य राज्यांतही मोठ्या प्रमाणात धर्मांतरे होत आहेत.
मिश्रा म्हणाले की, हिंदूंच्या धर्मांतासाठी मुसलमान आणि ख्रिस्ती यांना देशात मोकळीक देण्यात आली आहे. भारतात असे कोणते राज्य आहे का, जिथे मदरशांना आर्थिक साहाय्य आणि इमामांना वेतन दिले जात नाही ? ‘जमात-ए-इस्लामी’सारख्या संघटना आपल्या संकेतस्थळावर जाहीर करतात की, ‘धर्मांतर करणे हा आमच्या अस्तित्वाचा मुख्य उद्देश आहे.’ विविध ठिकाणी सरकारकडून हिंदूंचे दमन होत असताना धर्मांतर करणारे मिशनरी, तसेच सार्वजनिक ठिकाणी नमाज पडणारे कट्टरतावादी यांना हिंदू आता संघटीतपणे विरोध करत आहेत, हा एक आशेचा किरण आहे.
कुलकर्णी म्हणाले की, आतापर्यंत मोठ्या संख्येने झालेले हिंदूंचे धर्मांतर आमिष दाखवून किंवा बळजबरीने झाले आहे. ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर’ आहे. धर्म आणि संस्कृती नष्ट करून आतापर्यंत मोगलांसह अन्य परकीय आक्रमकांनी कसे आपल्या देशाचे विभाजन केले, हा खरा इतिहास सांगून हिंदूंमध्ये जनजागृती केली पाहिजे. हिंदू बांधवांना आपल्या हिंदु धर्माची महानता समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. देशात ‘धर्मांतरविरोधी कायदा’ आणून त्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. हिंदूंनी स्वत: धर्मपालन केले, तर आपल्या धर्माविषयी अभिमान निर्माण होईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App