गिरीराज सिंह यांचा मुख्यमंत्री केजरीवालांवर टोला Giriraj Singh
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर करून दिलासा दिला आहे. जामीन मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आले. यावेळी आप नेते व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्याचवेळी राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केजरीवालांवर निशाणा साधला आहे.
गिरीराज सिंह म्हणाले, “देशाच्या स्वातंत्र्यासाठीच ते तुरुंगात गेल्यासारखे वाटत आहे. त्यांना जामीनच मिळाला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहेत. जर न्यायालयाने त्यांना तुरुंगात पाठवले आणि न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला तर, ते काय आता संत झाले आहेत का?’ असा सवालही केला आहे.
China : चीनने निवृत्तीचे वय वाढवले, घटत्या लोकसंख्येमुळे निर्णय; पुरुष 63 व महिला 58 वर्षांपर्यंत काम करणार
संजौली बेकायदेशीर मशीद प्रकरणातील वाढत्या वादाबाबत केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, “शिमलाने देशाला एक आदर्श दिला आहे. मी सर्व हिंदूंना शिमलातून प्रेरणा घेऊन बेकायदेशीर मशिदी नष्ट करण्यासाठी आपल्या गावी एकत्र येण्यास सांगत आहे. राहुल गांधी आहेत. तुकडे टोळीचा म्होरक्या तो इटलीला जाणार का?’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App