प्रतिनिधी
चंडीगड – पंजाबमध्ये आज दुपारी झालेल्या राजकीय भूकंपाचा रिश्टर स्केल वाढला आहे. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू यांच्या राजीनाम्यापाठोपाठ दोन कॅबिनेट मंत्री रजिया सुल्तान आणि सिध्दू समर्थक प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र काँग्रेस श्रेष्ठींच्या दिशेने फेकले आहे.Gautam Seth resigns as General Secretary (in-charge training) of Punjab Congress
मुख्यमंत्री बदलून एक आठवडाही पूर्ण होत नाही, तोच ज्यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस श्रेष्ठींनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सारखा मुख्यमंत्री बदलला, त्या नवज्योत सिंग सिध्दू यांनीच आज दुपारी अचानक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन टाकला.
#UPDATE | Gautam Seth resigns as General Secretary (in-charge training) of Punjab Congress following resignation of party's state unit chief Navjot Singh Sidhu — ANI (@ANI) September 28, 2021
#UPDATE | Gautam Seth resigns as General Secretary (in-charge training) of Punjab Congress following resignation of party's state unit chief Navjot Singh Sidhu
— ANI (@ANI) September 28, 2021
Yoginder Dhingra resigns as General Secretary of Punjab Congress "in solidarity with Navjot Singh Sidhu" who stepped down earlier today Dhingra is the third Congress leader to quit after Minister Razia Sultana & state party treasurer Gulzar Inder Chahal post Sidhu's resignation — ANI (@ANI) September 28, 2021
Yoginder Dhingra resigns as General Secretary of Punjab Congress "in solidarity with Navjot Singh Sidhu" who stepped down earlier today
Dhingra is the third Congress leader to quit after Minister Razia Sultana & state party treasurer Gulzar Inder Chahal post Sidhu's resignation
कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीत पोहोचले आहेत. तर तिकडे नवज्योत सिंग सिध्दू यांनी तडकाफडकी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला. पंजाबच्या हिताशी समझोता करणार नाही, मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो आहे. पण काँग्रेसचा एकनिष्ठ सैनिक म्हणून काम करीत राहीन, असे नवज्योत सिंग सिध्दू यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
पण यानंतर कॅबिनेट मंत्री रजिया सुलतान, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस योगिंदर धिंग्रा, कोषाध्यक्ष गुलजार इंदर चहल, दुसरे सरचिटणीस गौतम सेठ यांनी राजीनामे दिले आहेत. बाकीच्या काँग्रेस आमदारांनी नवज्योत सिंग सिध्दू यांच्या तक्रारी काँग्रेस श्रेष्ठींनी ऐकून घ्याव्यात. त्यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारू नये, अशी विनंती केली आहे. पण पक्षातली ही बंडखोरी कमी होण्याऐवजी मुख्यमंत्री बदलल्यानंतर वाढल्याचेच दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App