विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजीव गांधी, नरसिंह राव आणि मोदी गौतम अदानींनी सांगितली उद्योगामधल्या मोठ्या ब्रेकची कहाणी!! निमित्त होते, इंडिया टीव्हीच्या आपकी अदालत कार्यक्रमाचे. आपकी अदालत मध्ये गौतम अदानी सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. Gautam Aadani says, Rajiv Gandhi, Narasimha Rao and Modi policies gave major breaks to industry
अदानी समूहाच्या उद्योग जीवनात तीन मोठे ब्रेक मिळाले. 1985 मध्ये राजीव गांधींनी एक्झिम पॉलिसी आणली आणि त्यामुळे अदानी समूहाला व्यवसायात फायदा झाला. 1991 मध्ये नरसिंह राव आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्था खुली केली. सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून व्यवसाय उद्योग पुढे नेण्यास प्रोत्साहन दिले.
त्याचाही लाभ अदानी समूहाला मिळाला. नरेंद्र मोदी यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या 12 वर्षांच्या दीर्घ काळात अदानी समूहाने उद्योगांमध्ये मोठी झेप घेतली. नरेंद्र मोदी यांच्याकडून कोणालाही कोणताही वैयक्तिक लाभ होऊ शकत नाही. पण धोरणात्मक लाभ सर्वांना होतात. तसाच लाभ अदानी समूहाला मोठ्या प्रमाणावर झाल्याने अदानी समूहाने भारतीय उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेतली, असे उद्गार गौतम अदानी यांनी काढले.
राहुल गांधींना प्रत्युत्तर
राहुल गांधी सातत्याने नरेंद्र मोदींनी आपल्या उद्योगपती मित्रांना देश विकल्याचा आरोप करतात. त्यात ते अदानी आणि अंबानी यांची नावे घेतात. या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना गौतम अदानी यांनी “पॉलिटिकली करेक्ट” उत्तर दिले. राहुल गांधींना त्यांचे राजकारण चालवायचे आहे. 2014 नंतर त्यांनी सातत्याने माझ्यावर टीका केल्याने गौतम अदानी कोण?, हे सगळ्या भारताला समजले. तोपर्यंत माझी बाह्य जगाला फारशी माहिती नव्हती. पण राहुलजींना त्यांचे वैचारिक राजकारण पुढे न्यायचे आहे. त्यामुळे ते कदाचित टीका करत असावेत. पण मी साधा उद्योगपती आहे. मला कोणाच्याही राजकारणाशी फारसे देणे घेणे नसते, असे उत्तर गौतम अदानी यांनी दिले.
गौतम अदानी यांच्या या उत्तरानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पण अद्याप काँग्रेसची प्रतिक्रिया आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App