नाशिक : operation sindoor च्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलाने ठिकठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये काही मेसेज पकडले गेले, त्यामुळे youtuber ज्योती मल्होत्र आणि अन्य सहा जणांचे पाकिस्तानातले हेरगिरीचे चाळे उघड्यावर आले. ज्योती मल्होत्राने चार वेळा पाकिस्तानात जाऊन तिथे काय उद्योग केले??, ती कुणाशी भेटली आणि बोलली??, रशीद बरोबर तिने कसा संपर्क केला??, त्याच्या मार्फत ती ISI च्या जाळ्यात कशी आली??, ती चिनी अधिकाऱ्यांना कुठे आणि कशी भेटली ती पाकिस्तानात इफ्तार पार्ट्यांमध्ये कशी सामील झाली??, भारताची कुठली माहिती तिने कुठे leak केली??, या सगळ्या चाळ्यांची वर्णने करणारी माहिती सगळ्या माध्यमांनी छापली. वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केली. वेगवेगळ्या youtubers त्यावर व्हिडिओ करून टाकले. त्यामुळे माध्यमांचे सगळे लक्ष फक्त ज्योती मल्होत्राच्या हेरगिरीवर केंद्रित राहिले.
पण त्या पलीकडे जाऊन ज्योती मल्होत्रापेक्षा High profile माणसाने नेमके काय आणि कुठे उद्योग केले, आणि तो माणूस कोण आहे ??, याकडे मात्र माध्यमांनी फारसे लक्ष दिले नाही, जे फार गंभीर होते आणि आहे.
माध्यमांनी सगळ्या बातम्यांचे consentration फक्त ज्योती मल्होत्रावर केले, पण त्या पलीकडे लोकसभेतले काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांच्या घातक उद्योगांकडे पूर्ण दुर्लक्ष केले. वास्तविक ज्योती मल्होत्राचे नीच उद्योग फार किरकोळ म्हणावेत, असले घातक उद्योग गौरव गोगोई यांनी केले. पण माध्यमांनी त्यांच्या बातम्या फारशा दिल्याच नाहीत, उलट सरकार पाठवणार असलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळांमध्ये काँग्रेसने खासदार गौरव गोगोई यांचे नाव देऊन त्यांचा “विशिष्ट गौरव” केला. पण गौरव गोगोई यांचे घातक उद्योग या “विशिष्ट गौरवासाठी” निश्चितच पात्र नव्हते.
– गौरव गोगोई 15 दिवस पाकिस्तानात
पहलगाम मधला हल्ला होण्यापूर्वी काहीच दिवस आधी गौरव गोगोई आपली ब्रिटिश वंशीय पत्नी एलिझाबेथ कॉलबर्न हिच्यासह 15 दिवसांचा पाकिस्तान दौरा करून आले. ते इस्लामाबादेत राहिले. पाकिस्तानी गृह खात्याच्या, खरं म्हणजे इंटर सर्विसेस इंटेलिजन्स ISI या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या निमंत्रणावरूनच गौरव गोगोई तिथे गेले होते. त्यांची पत्नी एलिझाबेथ कॉलबर्न ही climate change या विषयावर काम करणारी तज्ञ असून ती पाकिस्तानातल्या एका NGO कडून पगारी काम करत होती. पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेख हा एलिझाबेथ कॉलबर्नच्या खात्यात नियमितपणे तीन वर्षे विशिष्ट रकमा भरत होता. त्याने केलेल्या funding चे सगळे sources आसाम पोलिसांनी नेमलेल्या स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम अर्थात SIT च्या हाती लागले. त्यातून गौरव गोगोई आणि एलिझाबेथ कॉलबर्न यांच्या घातक उद्योगांची पोल खुलली. Climate change च्या अभ्यासाच्या नावाखाली भारतातली बरीच माहिती पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या पर्यंत पोहोचवली गेली.
– एलिझाबेथ पाकिस्तानी payroll वर
एलिझाबेथ कॉलबर्न ही 2025 पूर्वी एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन वर्षे पाकिस्तानी NGO च्या payroll वर होती. तिने अनेकदा पाकिस्तानचे दौरेही केले होते. गौरव गोगोई 15 दिवस पाकिस्तानात तिथल्या गृह खात्याचे पाहुणे म्हणून राहून आले. ते तिथे विशिष्ट ट्रेनिंग घेण्यासाठीच गेले होते, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी स्वतः उघडपणे पत्रकार परिषदेत दिली. आसाम सरकारने गौरव गोगोई यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालवायची तयारी केली. कारण SIT ला तसेच सबळ पुरावे हाती लागले. गौरव गोगोई चौकशी आणि तपासाच्या जाळ्यात आल्याबरोबर काँग्रेसच्या नेत्यांनी थयथयाट सुरू केला. या थयथयाटाच्या बातम्या माध्यमांनी दिल्या पण गौरव गोगोई यांच्या मूळ घातक उद्योगांकडे दुर्लक्ष केले. ज्योती मल्होत्राच्या खासगी आणि सार्वजनिक बातम्या वेगवेगळ्या अंगानी रंगवून देत असणाऱ्या कुठल्याच माध्यमांनी गौरव गोगोई आणि त्याच्या पत्नीचे घातक उद्योग एवढ्या मोठ्या प्रमाणावर समोर आणले नाहीत. त्यांनी ज्योती मल्होत्राच्या हेरगिरीवर सगळे लक्ष केंद्रित करताना गौरव गोगोई सारख्या High profile नेत्याच्या ज्ञघातक उद्योगाकडे पूर्ण दुर्लक्ष केले.
गौरव गोगोई फक्त आसाम मधून काँग्रेसचे खासदारच नाहीत, ते केवळ लोकसभेतले उपनेते नाहीत, तर आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र आहेत याचा अर्थ ते दीर्घकाळ सत्ता केंद्रित राजकारणात राहिलेत, त्यामुळे त्यांच्याकडे किती गुप्त माहिती असेल आणि त्यांनी ती कुठे, कशी पाकिस्तानला पुरविली असेल??, त्याचे गांभीर्य किती असेल??, हे शोधायचे भान माध्यमांना राहिले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App