विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ravi Pujari बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसोझा यांच्याकडे ५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कुख्यात गँगस्टर रवी पुजारी याला अधिकृतपणे अटक केली आहे. २०१८ मध्ये घडलेल्या या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी पुजारीला या प्रकरणात ताब्यात घेतले असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.Ravi Pujari
२०१८ मध्ये रेमो डिसोझा यांना रवी पुजारीच्या नावाने धमकीचे फोन आले होते. एका व्यावसायिक वादातून पुजारीने रेमो यांच्याकडे ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. याप्रकरणी ठाणे आणि मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.Ravi Pujari
रवी पुजारीला २०२० मध्ये सेनेगलमधून भारतात आणले गेले होते. तेव्हापासून तो विविध गुन्ह्यांसाठी कोठडीत आहे. पुजारीवर अनेक खंडणी आणि हत्येच्या प्रयत्नांचे गुन्हे दाखल आहेत. रेमो डिसोझा प्रकरणातील तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेने त्याचा ताबा मिळवला आहे.असे म्हटले जाते की, एका व्यापाऱ्याने रेमो डिसोझा यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला होता आणि त्या व्यापाऱ्यानेच पुजारीला रेमो यांना धमकावण्यासाठी ‘सुपारी’ दिली होती.
रवी पुजारीने ९० च्या दशकापासून बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांना आणि निर्मात्यांना धमकावले आहे. मात्र, त्याला दक्षिण आफ्रिका आणि सेनेगलमधून भारतात आणल्यानंतर त्याच्या टोळीचे कंबरडे मोडले आहे. रेमो डिसोझा प्रकरणात आता त्याला शिक्षेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App